urvashi rautela naseem shah
मुंबई, 16 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने याआधी क्रिकेटपटूबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत होती. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. उर्वशीचे नाव भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंतसोबत जोडले जात होते. सोशल मीडियावर दोघांमध्ये वादही झाला होता. तर पंतच्या अपघातानंतर तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना ऋषभला ज्या रुग्णालयात दाखल केले होते त्याचा फोटो पोस्ट केला होता. आता उर्वशी रौतेलाचे नाव पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहसोबत जोडलं जात आहे. आशिया कप २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यावेळी उर्वशी रौतेला स्टेडियममध्ये उपस्थित होती. नसीमसुद्धा पाकिस्तानकडून त्या सामन्यात खेळला होता. हेही वाचा : स्टिंग ऑपरेशनमुळे चेतन शर्मा अडचणीत? बीसीसीआय घेऊ शकते मोठा निर्णय
उर्वशीने त्या सामन्यानंतर इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. त्यात नसीम शाहसुद्धा एक भाग होता. तेव्हापासून चाहत्यांनी त्या दोघांची नावे एकत्र घ्यायला सुरुवात केलीय. आता उर्वशीने केलेल्या एका कमेंटमुळे पुन्हा एकदा दोघांच्या नावाची चर्चा होत आहे.
पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटर शादाब खानचा नुकताच निकाह झाला. त्याच्यासोबतचा फोटो नसीम शाहने शेअर केला आहे. त्या फोटोच्या कमेंटमध्ये उर्वशीने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलीय.
नसीमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच डीएसपी झाल्याबद्दल नसीमचे अभिनंदनही उर्वशीने केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोघांबाबत चर्चा होतेय.