JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / U19 World Cup: CRPF जवानाचा मुलगा बनला स्विंगचा सुलतान! टीम इंडियाचा मोठा शोध संपणार?

U19 World Cup: CRPF जवानाचा मुलगा बनला स्विंगचा सुलतान! टीम इंडियाचा मोठा शोध संपणार?

Under 19 World Cup 2022 : भारतानं 10 व्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेची सेमी फायनल गाठली आहे. टीम इंडियानं क्वार्टर फायनलमध्ये बांगलादेशचा (India vs Bangladesh) 5 विकेट्सनं पराभव केला.

0106

मुंबई, 30 जानेवारी : अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं बांगलादेशचा 5 विकेट्सनं पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. डावखुरा फास्ट बॉलर रवी कुमार या विजयाचा हिरो ठरला. रवीने 7 ओव्हर्समध्ये 14 रन देत 3 विकेट्स घेतल्या. रवीला या कामगिरीसाठी 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला.

जाहिरात
0206

रवीचे वडील CRPF मध्ये आहेत. 29 ऑक्टोबर 2003 रोजी कोलकातामध्ये त्याचा जन्म झाला. त्यानंतर त्याचे कुटुंबीय उत्तर प्रदेशमध्ये स्थायिक झाले. रवी तिथंच क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. भारद्वाज सरांच्या मार्गदर्शनाखाली कोचिंग घेतल्यानंतर रवीनं क्रिकेटमधील कारकिर्द घडवण्यासाठी कोलकातामध्ये जाण्याचं ठरवलं. (ACC Twitter)

जाहिरात
0306

रवी कुमार 2019 साली बालीगुंज क्रिकेट क्लबसाठी अंडर 16 गटातील ट्रायल देण्यासाठी गेला होता. त्यावेळी वयाचा शोध घेणाऱ्या टेस्टमध्ये फेल गेल्यानं क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) अधिकाऱ्यानं त्याला संधी दिली नाही. त्यानंतर कंचनगंज वॉरियर्सनं त्याला टी20 लीग खेळण्याची संधी दिली. (ACC Twitter)

जाहिरात
0406

रवी गेल्या काही कालावधीपासून टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि अंडर 19 टीमचे देवांग गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग घेत आहे. या ट्रेनिंगचा रवीला मोठा फायदा झाला आहे. तो बॉल आतमध्ये आणि बाहेर दोन्ही कडे स्विंग करू शकतो. त्याच्या उंचीमुळे त्याला बॉलला अधिक उंची देता येते. तसेच तो नव्या बॉलनं विकेट काढण्यात एक्स्पर्ट आहे. (BCCI Twitter)

जाहिरात
0506

रवीनं वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे. पण त्याला त्याच्या कोट्यातील पूर्ण ओव्हर्स टाकायला मिळाल्या नाहीत. कारण, भारतीय टीमनं आजवर एकाही मॅचमध्ये प्रतिस्पर्धीला संपूर्ण 50 ओव्हर्स बॅटींग करू दिलेली नाही. (bcci twitter)

जाहिरात
0606

झहीर खान, आशिष नेहरा, इराफान पठाण यांच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा लेफ्ट आर्म फास्ट बॉलरचा शोध संपलेला नाही. 2016 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपनंतर खलिल अहमदनं थोडी आशा दाखवली होती. पण, नंतर तो मागे पडला. टी. नटराजननं चांगली सुरूवात केली. पण, दुखापतीमुळे तो देखील बराच काळापासून बाहेर आहे. त्यामुळे रवी कुमार डावखुऱ्या फास्ट बॉलरचा भारताचा शोध समाप्त करणार का? हा खरा प्रश्न आहे. (T Natrajan Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या