JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Tokyo Paralympics : ऐतिहासिक! मनिष -सिंहराज जोडीचा पराक्रम, गोल्ड आणि सिल्व्हर मेडलची केली कमाई

Tokyo Paralympics : ऐतिहासिक! मनिष -सिंहराज जोडीचा पराक्रम, गोल्ड आणि सिल्व्हर मेडलची केली कमाई

टोकयो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) भारतानं आणखी एक गोल्ड मेडल पटकावलं आहे. यंदा शूटिंगमध्ये भारतानं गोल्डची कमाई केलीय. त्याचबरोबर या प्रकारातील सिल्व्हर मेडलही भारतानं पटकावलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

टोकयो, 4 सप्टेंबर : टोकयो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) भारतानं आणखी एक गोल्ड मेडल पटकावलं आहे. यंदा शूटिंगमध्ये भारतानं गोल्डची कमाई केलीय. 19 वर्षांचा शूटर मनिष नरवाल (Manish Narwal) यानं 50 मिटर पिस्तूल इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल कमाई केली. या प्रकारातील सिल्व्हर मेडलही भारताने पटकावले. सिंहराजनं हे मेडल पटकावलं. मनिष आणि सिंहराज यांच्यात गोल्ड मेडलसाठी जोरदार लढत झाली.यामध्ये अखेर मनिषनं बाजी मारली. या स्पर्धेतील भारताचे हे तिसरे गोल्ड मेडल आहे.

भारताची सर्वोत्तम कामगिरी पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी भारतानं टोकयोमध्ये नोंदवली आहे. या स्पर्धेत भारतीय टीमनं आत्तापर्यंत 3 गोल्ड, 7 सिल्व्हर आणि 5 ब्रॉन्झ असे एकूण 15 मेडल पटकावले आहेत. यापूर्वी रिओमध्ये झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतानं 2 गोल्ड आणि 4 सिल्व्हर मेडलची कमाई केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या