लंडन, 29 जुलै : एखाद्या फलंदाजांने षटकार मारल्यानंतर पंचांनी षटकार दिल्याचं आणि नंतर त्याच चेंडूवर बादही दिलं असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण हे घडलं आहे. इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन वनमध्ये मिडिलसेक्स आणि वॉरिकशॉयर यांच्यातील सामन्यावेळ हे बघायला मिळालं. मिडिलसेक्सचा कर्णधार टॉबी रोलँड जोन्सने एका चेंडूवर षटकार मारला. त्याचा आनंद काही क्षणच टिकला. बर्मिंघममध्ये मिडिलसेक्स आणि वॉरिकशॉयर यांच्यात एक सामना खेळण्यात आला. या सामन्यात वॉरिकशॉयरच्या संघाला २२.५ षटकात ६६ धावाच करता आल्या. मिडिलसेक्सचा कर्णधार पहिल्या डावात नवव्या क्रमांकावर फलंदाजील आला. त्यावेळी संघाची धावसंख्या ७ बाद १४८ धावा अशी होती. जोन्सने एका चेंडूवर षटकार मारला. पंचांनी षटकार दिलाही होता. पण तेव्हा विकेटकिपरने पंचांचे लक्ष स्टम्पकडे वेधले. बेल्स खाली पडल्या होत्या. Cricket : यंदाच्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात ‘या’ स्पिनरची निवड निश्चित? चहलचा पत्ता होणार कट
जोन्सने षटकार मारल्यानंतर तो थोडा मागे सरकला होता. त्यानंतर हातातली बॅट स्टम्पला लागल्याने बेल्स खाली पडल्या. त्यामुळे तो हिटविकेट बाद झाला. आता याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिडिलसेक्सने पहिल्या डावात १९९ धावा केल्या. त्यांना पहिल्या डावात १३९ धावांची आघाडी मिळाली. मिडिलसेक्सला सामना जिंकण्यासाठी ९४ धावा हव्या होत्या. त्यांनी २ गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पार केलं.