JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / TNPL : शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली पण नो बॉलने घात केला, एका चेंडूत दिल्या 18 धावा

TNPL : शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली पण नो बॉलने घात केला, एका चेंडूत दिल्या 18 धावा

अखेरच्या षटकातील पहिल्या पाच चेंडूत 8 धावा दिल्या. पण अखेरच्या चेंडूवर त्याने तब्बल 18 धावा दिल्या.

जाहिरात

कर्णधाराने एका चेंडूत दिल्या 18 धावा

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई, 14 जून : आयपीएल 2023 संपल्यानंतर आता तामिळनाडु प्रीमियर लीगची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. टीओएनपीएल 2023 च्या दुसऱ्याच सामन्यात एक आगळा वेगळा विक्रम नोंद झाला आहे. सालेम स्पार्टन्स आणि चेपॉक सुपर गिलीज यांच्यात दुसरा सामना झाला. यावेळी स्पार्टन्सचा गोलंदाज अभिषेत तंवरने भारतीय टी20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वात महागडा चेंडू टाकला. अभिषेत तंवरने सुपर गिलीजच्या डावाचे अखेरचे षटक टाकले. त्याने पहिल्या पाच चेंडूत 8 धावा दिल्या. पण अखेरच्या चेंडूवर त्याने तब्बल 18 धावा दिल्या. खरंतर अखेरच्या चेंडूवर त्याने सुपर गिलीजचा फलंदाज संजय यादवला क्लीन बोल्ड केलं होतं. याचा आनंदही तो साजरा करत होता. पण पंचांनी हा चेंडू नो बॉल दिला. रिप्लेमध्ये अभिषेकचा पाय क्रीजच्या बाहेर असल्याचं दिसलं होतं. T20 लीगमध्ये लागू होणार ICC चे दोन नवीन नियम, IPL वर किती परिणाम होणार?  

संबंधित बातम्या

नो बॉलनंतर एक चेंडू फ्री हिट होता. तोसुद्धा अभिषेकने नो बॉल टाकला. यावर संजय यादवने डीप मिडविकेटवरून षटकार खेचला. पुन्हा अभिषेकने अखेरचा चेंडू टाकला तोसुद्धा नो बॉल. यावर संजयने दोन धावा घेतल्या. तर सलग तीन नो बॉल टाकल्यानंतर अभिषेकने वाईड चेंडू टाकला. यावर 1 धाव एक्स्ट्रा मिळाली. अभिषेकने पुन्हा चेंडू टाकला त्यावर षटकार मारला. तीन नो बॉल, एक वाईड, दोन षटकार, दोन पळून काढलेल्या धावा अशा मिळून एकूण 18 धावा एका चेंडूवर मिळाल्या. अभिषेकच्या एका खराब चेंडूमुळे सुपर गिलीजने 217 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल सालेम स्पार्टन्स १५६ धावांपर्यंतच मजल मारू शकली. तर एका चेंडूवर 18 धावा देऊनही सर्वात महागडा चेंडू टाकण्याच्या नकोशा विक्रमापासून त्याची सुटका झाली. एका चेंडूवर सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम क्लिंट मकॉयच्या नावावर आहे. 2012-13 च्या बीग बॅश लीगमध्ये त्याने 1 चेंडूत 20 धावा दिल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या