पॅरीस, 12 जून : टेनिसमधील नंबर वन खेळाडू नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याने इतिहास रचला आहे. जोकोविचने 13 वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या राफेल नदाल (Rafael Nadal) याला सेमी फायनलमध्ये पराभूत केले. फेंच ओपनच्या सेमी फायनलमध्ये नदालला पराभूत करणारा नदाल हा पहिलाच खेळाडू बनला आहे. पहिला सेट हरल्यानंतर जोकोविचनं जबरदस्त पुनरागमन करत नदालचा 3-6, 6-3, 7-6 आणि 6-2 असा पराभव केला. आता रविवारी फायनलमध्ये जोकोविचची लढत ग्रीसच्या स्टेफानोस सिटसिपास (Stefanos Tsitsipas) होणार आहे. जोकोविचने यापूर्वी 2016 साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. जोकोविचने आतापर्यंत 18 ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावली आहेत. तब्बल चार तास 11 मिनिटे चाललेल्या या मॅचमध्ये नदाल आणि जोकिविच या दोघांनीही सर्वोत्तम खेळ केला. 20 ग्रँड स्लॅम विजेपदं पटकावणाऱ्या नदालचा क्ले कोर्टावर 108 मॅचमधील हा फक्त तिसराच पराभव आहे. विशेष म्हणजे यापैकी दोन वेळा जोकोविचनेच नदालला हरवले आहे.
सिटसिपासची फायनलमध्ये धडक ग्रीसचा तरुण टेनिसपटू स्टेफानोस सिटसिपास याने देखील फ्रेंच ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. त्याने सेमी फायनलमध्ये अँलेक्झँडर झ्वरेव्ह याचा पाच सेटमध्ये पराभव केला. साडेतीन तासांपेक्षा जास्त चाललेली ही मॅच सिटसिपास याने 6-3,6-3,4-6,4-6, 6-3 या फरकाने जिंकली. सिटसिपासने ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या फायनलमध्ये पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. हिरोईनपेक्षा दिसते सुंदर, 13 व्या वर्षी क्रिकेटसाठी सोडलं घर सिटसिपासने वयाच्या तिसऱ्या वर्षीच टेनीसचे धडे गिरवण्यास सुरूवात केली होती. त्याने 6 व्या वर्षांपासून टेनिसचे प्रक्षिक्षण घेण्यास सुरू केले. त्याची आई ज्यूलिया व्यावसायिक टेनीसपटू होती. तर वडील टेनिस कोच होते.