JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup : India vs Pakistan सामन्यानंतरची खरी Story, मैदानात काय झालं पाहा

T20 World Cup : India vs Pakistan सामन्यानंतरची खरी Story, मैदानात काय झालं पाहा

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानने (India vs Pakistan) पराभवाचा धक्का दिला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 25 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानने (India vs Pakistan) पराभवाचा धक्का दिला. भारताने दिलेलं 152 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पार केलं. बाबर आझमने (Babar Azam) 51 बॉलमध्ये नाबाद 66 रन आणि मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) 55 बॉलमध्ये नाबाद 79 रन केले. टीम इंडियाचा टी-20 मधला 10 विकेटने झालेला हा पहिलाच पराभव आहे, तर पाकिस्तानने पहिल्यांदाच टी-20 सामना 10 विकेटने जिंकला. वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताचा पराभव केला आहे. याआधी 5 टी-20 आणि 7 वनडे वर्ल्ड कपच्या सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीममधले सामने कायमच तणावपूर्ण असतात. दोन्ही देशांमध्ये असलेल्या संबंधांमुळे या सामन्यांना कायमच वेगळं रूप दिलं जातं. कुछ खास है हम सभी में..! सामना गमावला, पण मन जिंकलं, पाकिस्तानीही झाले किंग कोहलीचे ‘जबरा फॅन’ भारत आणि पाकिस्तान यांच्यातला टी-20 सामना संपल्यानंतर मात्र मैदानात वेगळंच चित्र पाहायला मिळालं. टीम इंडियाचा मेंटर एमएस धोनी, पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, इमाद वसीम आणि इतर खेळाडू मैदानात गप्पा मारताना दिसले. आयसीसीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेयर केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याची ही खरी स्टोरी आहे, असं कॅप्शन आयसीसीने या व्हिडिओला दिलं.

त्याआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानेही मोठं मन दाखवलं. सामना संपल्यानंतर विराटने पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद रिझवानला मिठी मारली. तसंच विराट सामना संपल्यानंतर बाबर आझमसोबत बोलतानाही दिसला.

टी-20 वर्ल्ड कपमधला भारताचा पुढचा सामना रविवारी न्यूझीलंडविरुद्ध आहे. भारताच्या ग्रुपमध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाच्या टीम आहेत. या ग्रुपमधल्या टॉप-2 टीम सेमी फायनलसाठी क्वालिफाय होणार आहेत. पाकिस्तानी पत्रकारने विचारला असा प्रश्न, विराटवरही आली डोक्याला हात लावण्याची वेळ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या