JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / विचित्र विकेटचं विचित्र सेलिब्रेशन, क्रिकेट मॅचचा असा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल!

विचित्र विकेटचं विचित्र सेलिब्रेशन, क्रिकेट मॅचचा असा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल!

रोमानियाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पावेल फ्लोरिन (Pavel Florin) याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आपल्या अनोख्या बॉलिंग ऍक्शनमुळे एक-दोन वर्षांपूर्वी फ्लोरिन चर्चेत आला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जुलै : रोमानियाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पावेल फ्लोरिन (Pavel Florin) याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आपल्या अनोख्या बॉलिंग ऍक्शनमुळे एक-दोन वर्षांपूर्वी फ्लोरिन चर्चेत आला होता. आता यावेळी तो सेलिब्रेशनुमळे चर्चेत आला आहे. बनासा आणि बुखारेस्ट ग्लॅडिएटर्स यांच्यात ईसीएस टी10 मॅचमध्ये हा प्रकार घडला. पावेल फ्लोरिनने विचित्र पद्धतीने विकेट घेतली. यानंतर त्याने अशाच विचित्र पद्धतीने सेलिब्रेशन केलं. पावेल फ्लोरिनचं हे आगळंवेगळं सेलिब्रेशन तुम्ही आधी कधीही पाहिलं नसेल. विकेट घेतल्यानंतर फ्लोरिन कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पळायला लागला. तिकडे जाऊन त्याने कॉमेंटेटरच्या हातातून माईक घेतला आणि ग्लेडिएटर्स असं जोरजोरात ओरडू लागला.

संबंधित बातम्या

नवव्या ओव्हरमध्ये फ्लोरिनने बॉलला जास्तच फ्लाईट दिली, त्यामुळे बॅट्समन मोठा शॉट मारण्यासाठी गेला, पण बॉलच्या गतीमुळे तो फसला आणि बॉल हवेत गेला. यानंतर फिल्डरने कॅच पकडला. रोमानियाचा पावेल फ्लोरिन आपल्या आगळ्यावेगळ्या ऍक्शनमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ‘माझी बॉलिंग ऍक्शन सुंदर नाही, तसंच प्रभावी देखील नाही, पण मला त्याची परवा नाही, कारण मला क्रिकेट आवडतं,’ अशी प्रतिक्रिया फ्लोरिनने दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या