JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'पंतला सगळे मंदिराची घंटा समजत होते', पाहा असं का म्हणाला रैना?

'पंतला सगळे मंदिराची घंटा समजत होते', पाहा असं का म्हणाला रैना?

मागच्या वर्षापर्यंत ऋषभ पंतवर (Rishabh Pant) जोरदार टीका करण्यात येत होती. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) बॅट्समन सुरेश रैना (Suresh Raina) याने पंतवर झालेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 एप्रिल : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आणि मग इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट, टी-20 आणि वनडे सीरिजमध्ये ऋषभ पंतने (Rishabh Pant) धमाकेदार कामगिरी केली. पंतने केलेल्या आक्रमक खेळींमुळे ऑस्ट्रेलियात आणि इंग्लंडविरुद्ध भारताला ऐतिहासिक विजय मिळाला. आता तर ऋषभ पंत याला आयपीएलमध्ये (IPL 2021) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार करण्यात आलं आहे. पण मागच्या वर्षापर्यंत ऋषभ पंतवर जोरदार टीका करण्यात येत होती. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) बॅट्समन सुरेश रैना (Suresh Raina) याने पंतवर झालेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश रैनाने हिंदुस्तान टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये रैना म्हणाला, ‘वर्ल्ड कप 2019 नंतर कोणीही ऋषभ पंतला मैदानातील घंटा समजून वाजवत होतं. पंतसारख्या खेळाडूला कर्णधाराचं समर्थन मिळणं खूप गरजेचं आहे. तो स्ट्रोक प्लेयर आहे, त्यामुळे त्याला खुलून खेळण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. तो टीम इंडियासाठी कमीत कमी 10-15 वर्ष खेळेल.’ ‘पंत प्रत्येक इनिंगमध्ये धमाका करेल, असं ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून वाटत होतं. जॅक लिचविरुद्ध तर तो प्रत्येक बॉललाच सिक्स मारेल असं वाटत होतं. तुम्हाला पंतचं समर्थन करावं लागेल, कधी कधी तो मोठे शॉट मारताना आऊटही होईल. पंतसारखे खेळाडू खूप रन बनवतात, पण जेव्हा ते कठीण काळातून जात असतात तेव्हा तुम्ही त्यांना रनच्या हिशोबाने नाही, तर त्यांच्या क्षमेतेने टीममध्ये ठेवलं पाहिजे, असं ब्रायन लारा म्हणायचा,’ असं रैनाने सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या