कसोटीतील विजयानंतर नाटू नाटू गाण्यावर थिरकले सुनील गावस्कर, पाहा व्हिडिओ
मुंबई, 14 मार्च : सोमवारचा दिवस भारतीयांसाठी फारच खास ठरला. एकीकडे भारतीय क्रिकेट संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधेही धडक दिली तर दुसरीकडे RRR चित्रपटाची नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर अवॉर्ड प्राप्त झाला. या दोन्ही घटनांनंतर भारताचे दिग्गज माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी अहमदाबादच्या स्टेडियमवर नाटू नाटू गाण्यावर ताल धरला. गावस्करांच्या हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेला चौथा कसोटी सामना ड्रॉ झाला. त्यामुळे भारताने या मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका जिंकली. भारताच्या विजयानंतर सुनील गावस्कर यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सामन्यानंतर एक मुलाखत देत असताना त्यांनी अँकर सोबत नाटू नाटू गाण्याची स्टेप केली.
गावस्कर RRR चित्रपटाच्या नाटू नाटू गाण्याला मिळालेल्या ऑस्कर अवॉर्ड बद्दल बोलताना म्हणाले, “RRR च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. ज्यांनी गाणी संगीतबद्ध केली त्यांचे अभिनंदन. मी हा चित्रपट पाहिला असून हा एक उत्तम चित्रपट आहे. संपूर्ण चित्रपटातील सर्व कलाकार अप्रतिम होते. आज या चित्रपटाची गाण्याने ऑस्कर अवॉर्ड जिंकला याचा आम्हाला आनंद आहे”.
सुनील गावस्करांचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .