JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / जडेजा-स्मिथचा याराना! आधी धडकले, नंतर हसत हसत मारली मिठी

जडेजा-स्मिथचा याराना! आधी धडकले, नंतर हसत हसत मारली मिठी

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात स्टिव्ह स्मिथने रविंद्र जडेजाचं कौतुक केलं होतं. त्याच्या गोलंदाजीवर स्मिथने थम्ब्स अप करत रिएक्शन दिली होती.

जाहिरात

jadeja and smith

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 18 फेब्रुवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांची दुसरी कसोटी कालपासून दिल्लीत सुरू आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवशी रविंद्र जडेजा आणि स्टिव्ह स्मिथ यांच्यात एक मजेशीर प्रसंग बघायला मिळाला. लंच ब्रेकनंतर भारताचे विराट कोहली आणि रविंद्र जडेजा मैदानात परतले. तेव्हा सामन्यावेळी क्षेत्ररक्षण करणारा स्टिव्ह स्मिथ जडेजाला जाऊन थडकला. त्यानंतर दोघेही हसले आणि स्मिथने जडेजाला मिठी मारली. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात स्टिव्ह स्मिथने रविंद्र जडेजाचं कौतुक केलं होतं. त्याच्या गोलंदाजीवर रिएक्शन देताना स्मिथने थम्ब्स अप करत कौतुकाचा इशारा केला होता. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हेही वाचा :  कोहलीच्या विकेटवरून वाद? पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह, विराटची रिएक्शन व्हायरल दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६३ धावात आटोपला. त्यानतंर पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या भारताची अवस्था चहापानापर्यंत ७ बाद १७९ अशी झाली होती. भारताने ६६ धावात चार गडी गमावले होते. त्यानतंर विराट आणि कोहलीने डाव सावरत अर्धशतकी भागिदारी केली. रविंद्र जडेजाने नागपूर कसोटीत फलंदाजी अन् गोलंदाजीतही कमाल केली होती. आता दुसऱ्या कसोटीतही त्याने पहिल्या डावात गोलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या होत्या. तर फलंदाजी करताना २६ धावा केल्या आहेत. सध्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड असल्याचं चित्र असून पहिल्या डावात आघाडी घेऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या