JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WADA च्या चुकीचा खेळाडूला फटका, टी20 वर्ल्ड कपला मुकला आणि आता...

WADA च्या चुकीचा खेळाडूला फटका, टी20 वर्ल्ड कपला मुकला आणि आता...

डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यानंतर क्रिकेटपटूवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या स्पर्धांना क्रिकेटपटू मुकला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलंबो, 08 मार्च : लंकेचा आघाडीच्या फळीतला फलंदाज कुसल परेराला 2016 मध्ये अँटी डोपिंग एजन्सीने जवळपास सहा महिन्यांसाठी निलंबित केलं होतं. अँटी डोपिंग एजन्सीच्या रिपोर्टनुसार, तो एका युरिन टेस्टमध्ये अपयशी ठरला होता. त्यानंतर कुसलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. अँटी डोपिंग एजन्सीचा रिपोर्ट चुकीचा असल्याचं समोर आलं आहे. त्याने कोणत्याही बंदी असलेल्या उत्तेजक पदार्थांचे सेवन केल्याचे आढळून आले नाही. कुसल परेराची चाचणी कतरमधील लॅबने केली होती. त्यांच्याकडून चुकीची माहिती दिली गेल्याने कुसलवर निलंबनाची कारवाई झाली. त्यानंतर पॅरिसच्या लॅबने तपासणी केल्यानंतर आधीच्या रिपोर्टमध्ये चूक असल्याचे स्पष्ट केले. आता आयसीसी आणि वाडाने त्या लॅबला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं आहे. डोपिंग चाचणीचा रिपोर्ट चुकीचा असल्याचं समोर आल्यानंतर कुसल परेराने याबाबत वाडाशी चर्चा केली. त्यानंतर निलंबनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली होती. त्यामुळे परेराला 500000 अमेरिकन डॉलर इतकी रक्कम मिळू शकते.परेरा न्यूझीलंड दौऱ्यावर असताना तो ड्रग टेस्टमध्ये दोषी आढळल्याचं वृत्त आलं होतं. त्यानंतर कुसल परेरा 2016 च्या टी20 वर्ल्ड कप आणि आशिया कपमध्ये खेळू शकला नव्हता. लंकेकडून खेळणाऱ्या कुसल परेराला त्याच्या फटकेबाजीसाठी ओळखलं जातं. लंकेकडून त्याने 18 कसोटी आणि 101  एकदिवसीय तर 47 टी20 सामने खेळले आहेत. यात कुसलने कसोटीत 934 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2825 तर टी20 मध्ये 1293 धावा केल्या आहेत. कुसल परेरा फलंदाजीसह यष्टीरक्षक म्हणूनही खेळतो. पाहा VIDEO : एकटी लढली पण फायनलचा पराभव लागला जिव्हारी, शेफाली मैदानावरच रडली

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या