JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / Euro Cup जिंकल्याच्या आनंदात कोरोनाचा विसर, इटलीमध्ये तिसऱ्या लाटेचा धोका

Euro Cup जिंकल्याच्या आनंदात कोरोनाचा विसर, इटलीमध्ये तिसऱ्या लाटेचा धोका

इटलीनं युरो कप (Euro Cup 2020) जिंकताच रोम, मिलान, फ्लोरेंस या शहरांमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरत पार्टी साजरी केली. त्यामुळे आता इटलीमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे.

0107

इटलीनं मागील आठवड्यात झालेल्या युरो कप (Euro Cup 2020) फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत विजेतेपद पटकावले. इटलीमधील अनेक शहारांमध्ये या विजेतेपदाचं जोरदार सेलिब्रेशन सुरू आहे. या विजयाच्या आनंदामध्ये लोकांनी कोरोना महामारीच्या नियमांचं (Covid-19 Protocol) पालन केलं नाही. त्यामुळे आता इटलीमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे.

जाहिरात
0207

इटलीनं युरो कप जिंकताच रोम, मिलान, फ्लोरेंस या शहरांमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरत पार्टी साजरी केली. मास्क न वापरता तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडूनअनेक ठिकाणी पार्टी केली. या पार्ट्या इटलीला चांगलीच भोवणार आहेत. या सेलिब्रेशनंतर इटलीमध्ये कोरोना पेशंट्सची संख्या सातत्याने वाढत आहे.

जाहिरात
0307

एक जुलै रोजी इटलीमध्ये 879 कोरोनाच्या नव्या केसची नोंद झाली होती. मागील रविवारी नव्या कोरोना पेशंट्सची संख्या 3127 झाली आहे. गेल्या 6 दिवसांपासून यामध्ये वाढ होत आहे.

जाहिरात
0407

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये इटलीचा समावेश होतो. इटलीमध्ये आजवर कोरोनामुळे 1, 27, 867 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 42 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जाहिरात
0507

यावर्षी फेब्रुवारी ते एप्रिलच्या दरम्यान इटलीमध्ये रोज 3 ते 4 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता पुन्हा एकदा संक्रणणाचे प्रमाण वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

जाहिरात
0607

इटलीमध्ये मागील वर्षी देखील कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. हॉस्पिटलमधील बेड्सची कमतरता, मेडिकल सुविधांचा अभाव, डॉक्टरांची अपुरी संख्या यामुळे इटलीचे जनजीवन विस्कळीत झाले होते. या अनुभवातून इटलीनं कोणताही धडा घेतलेला नाही.

जाहिरात
0707

युरो कप स्पर्धेत मिळालेल्या विजयानंतरच कोरोना पेशंट्सच्या संख्येत वाढ झाली असं वृत्त रॉयटर्ल या न्यूज एजन्सीनं दिलं आहे. कोरोना संक्रमण झालेल्या लोकांचं सरासरी वय 28 आहे. लोकांनी पार्टीनिमित्त केलेल्या गर्दीमुळेच कोरोनाचा प्रसार वेगानं झाला असल्याचं इटलीचे आरोग्य प्रमुख फ्रँको लोकेटली यांनी सांगितले.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या