सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट टीमच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. ‘दादा’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या गांगुलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं (बीसीसीआय) अध्यक्षपदही भूषवलं आहे. माजी कॅप्टन आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष असलेल्या गांगुलीचा आज वाढदिवस आहे. 8 जुलै 1972 रोजी जन्मलेला सौरव आज 51 वर्षांचा झाला आहे. यानिमित्त त्याची लक्झरी लाइफस्टाइल, कमाई आणि एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊ या. ‘अमर उजाला’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
आलिशान घर : सौरव आपल्या कुटुंबासह पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता इथे राहतो. त्याच्या घराचे फोटो सोशल मीडियावर आले आहेत. त्याने आपल्या घराच्या सजावटीसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. घराचा आतला भाग अतिशय सुंदर अशा राजवाड्यासारखा आहे.
वडिलोपार्जित संपत्तीचा मालक : सौरव गांगुलीच्या वडिलोपार्जित घराची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे. त्यात 48 खोल्या आहेत. याशिवाय, तो एका दुमजली हवेलीचाही मालक आहे.
कार कलेक्शन : बेंगॉल टायगर नावाने प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुलीकडे अनेक लक्झरी वाहनांचा संग्रह आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे 62 लाख रुपये किमतीची रेंज रोव्हर, 72 लाख रुपये किमतीची मर्सिडीज जीएल, ऑडी, सीएलके कन्व्हर्टिबल आणि बीएमडब्ल्यू सीरिजच्या कार आहेत.
कमाईचे स्रोत : सौरव गांगुली जाहिरातींमधून मोठी कमाई करतो. तो अनेक मोठ्या कंपन्यांचा ब्रँड अँबेसेडर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गांगुली एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी दर वर्षी एक कोटी 35 लाख रुपये आकारतो. गांगुलीनं ‘दादागिरी’ नावाचा बंगाली टीव्ही शोदेखील होस्ट केला आहे. त्यासाठी तो दर आठवड्याला 1 कोटी रुपये घेत असे.
फुटबॉल क्लबचा सहमालक : सौरव गांगुली हा आयएसएल क्लब एटीके मोहन बागानचा सहमालक आहे. मोहन बागान हा आशिया खंडातला सर्वांत जुना फुटबॉल क्लब आहे.
स्टार्टअपमध्ये गुंतवणूक : झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, सौरव गांगुलीनं ‘JustMyRoots’ या फूड डिलिव्हरी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. याशिवाय, त्यानं नोएडातल्या ‘Classplus’ या एज्युटेक स्टार्टअपमध्येही गुंतवणूक केली आहे.
एकूण संपत्ती : सौरव गांगुली हा सर्वांत श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. एका वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, त्याची मालमत्ता अंदाजे 365 कोटी रुपयांची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.