टीम इंडियाची ओपनर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) तिच्या खेळासोबतच सौंदर्यामुळेही लोकप्रिय आहे.
टीम इंडियाची ओपनर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) तिच्या खेळासोबतच सौंदर्यामुळेही लोकप्रिय आहे. डावखुरी असल्यामुळे तिच्या बॅटिंगची तुलना सौरव गांगुलीसोबतही केली जाते. ज्याप्रकारे सौरव गांगुली ऑफ साईडला उत्कृष्ट शॉट मारायचा, अगदी तसेच शॉट स्मृतीही लगावते. स्मृतीच्या सौंदर्यावरही अनेक चाहते घायाळ आहेत.
स्मृतीच्या सौंदर्याचे चाहते असलेले तिचे अनेक चाहते सोशल मीडियावर वैयक्तिक प्रश्न विचारत असतात. स्मृती मंधानाचं असंच एक जुनं ट्वीट सध्या व्हायरल झालं आहे. या ट्वीटमध्ये तिला लग्नाबद्दलचा प्रश्न विचारला गेला आहे.
स्मृतीला विराट नावाच्या एका व्यक्तीने तू लव्ह मॅरेज करणार का अरेंज? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला स्मृतीनेही हटके उत्तर दिलं.
या प्रश्नाला स्मृतीने लव्ह-रेंजड असं उत्तर दिलं. म्हणजेच प्रेम करून मग दोघांच्या घरच्यांची परवानगी घेऊन लग्न करू, असं स्मृती म्हणाली.
स्मृती फक्त 24 वर्षांची आहे, लग्नाला अजून बराच वेळ आहे. आपलं सध्या फक्त क्रिकेटवरच लक्ष आहे, असं तिने आधीही सांगितलं आहे. स्मृती सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे.
स्मृती मंधानाने भारतासाठी 58 वनडे, 78 टी-20 आणि 3 टेस्ट खेळल्या आहेत. वनडेमध्ये तिची सरासरी 41 च्या वर असून तिने 2204 रन केल्या आहेत. मंधानाने वनडेमध्ये 4 शतकंही केली आहेत.