JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सांगलीच्या स्मृतीने इतिहास घडवला, BBL मध्ये शतक करणारी पहिली भारतीय, 17 बॉलमध्ये ठोकले 74 रन

सांगलीच्या स्मृतीने इतिहास घडवला, BBL मध्ये शतक करणारी पहिली भारतीय, 17 बॉलमध्ये ठोकले 74 रन

स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये (Women Big Bash League) इतिहास घडवला आहे. या स्पर्धेत शतक करणारी स्मृती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेलबर्न, 17 नोव्हेंबर : स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये (Women Big Bash League) इतिहास घडवला आहे. या स्पर्धेत शतक करणारी स्मृती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. सिडनी थंडरकडून (Sydney Thunder) खेळताना स्मृतीने 64 बॉलमध्ये नाबाद 114 रन केले. स्मृतीच्या या इनिंगमध्ये 14 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता, म्हणजेच तिने 17 बॉलमध्ये 74 रन केले. या टी-20 लीगमधला हा कोणत्याही खेळाडूचा सर्वाधिक स्कोअर आहे. स्मृतीच्या या खेळीनंतरही सिडनीच्या टीमने हा सामना 4 रनने गमावला. मेलबर्नने पहिले बॅटिंग करत 4 विकेट गमावून 175 रन केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सिडनीने 2 विकेट गमावून 171 रन केले.

संबंधित बातम्या

सिडनी थंडरला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 13 रनची गरज होती, पण भारतीय टी-20 टीमची कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) फक्त 8 रन देऊन टीमला रोमांचक विजय मिळवून दिला. मंधानाने या ओव्हरमध्ये 4 बॉलचा सामना केला, पण तिला फक्त 6 रन करण्यात आले. हरमनप्रीतने 4 ओव्हरमध्ये 27 रन देऊन एक विकेट मिळवली. याआधी मेलबर्नकडून खेळणाऱ्या हरमनप्रीतने बॅटनेही शानदार कामगिरी केली. तिने 55 बॉलमध्ये नाबाद 81 रन केले, यामध्ये 11 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. स्मृती मंधानाने या शतकासह बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक स्कोअर करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. याआधी 2017 साली एश्ले गार्डनरने सिडनी सिक्सर्सकडून खेळताना 114 रनच केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या