विराट कोहली आणि शाहरुख खानच्या फॅन्समध्ये 'ट्विटर वॉर', कारण ऐकून बसेल धक्का
मुंबई, 29 मार्च : भारताचा स्टार क्रिकेटर आणि सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान हे जगभरात नावाजलेल्या भारतीयांपैकी एक आहेत. आपल्या कामामुळे या दोघांनी जगभरात प्रसिद्धी मिळवली असून जगाच्या कानाकोपऱ्यात यांचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु सध्या विराट कोहली आणि शाहरुख खान या दोघांच्या चाहत्यांमध्ये ट्विटर वॉर रंगला आहे. दोघांचे चाहते आपल्या आवडत्या स्टारला बेस्ट म्हणण्यावर भर देताना दिसत आहेत. सुरुवातीला शाहरुखचे चाहते त्याच्या अभिनयाबद्दल आणि प्रसिद्धी वरून विराटच्या चाहत्यांना ट्रोल करत होते. तर त्यावर विराटाचे चाहते त्याच्या क्रिकेट फॉर्मबद्दल आणि इंस्टाग्रामवरील फॉलोवर्सवरून शाहरुखच्या चाहत्यांची फिरकी घेत होते. इथपर्यंत ठीक होत मात्र आता या दोघांच्या चाहत्यांमध्ये भांडण टोकाला जाऊन दोघांचे चाहते अपमानास्पद टिप्पणी आणि आक्षेपार्ह मिम्स शेअर करत आहेत. यामुळे ट्विटरवरील वातावरण तापलं आहे.
सध्या विराट कोहली आणि शाहरुख खानचे चाहते या ट्विटर वॉरमध्ये उडी घेताना पाहायला मिळत आहेत.