हळदीत शार्दूल ठाकूरने केला झिंगाट डान्स, Video आला समोर
मुंबई, 25 फेब्रुवारी : सध्या भारतीय क्रिकेट विश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. के एल राहुल आणि हार्दिक पांड्या नंतर भारताचा स्टार क्रिकेटर शार्दूल ठाकूर हा 27 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. मुंबईत मराठमोळ्या क्रिकेटरचा हळदी समारंभ पारपडला. या समारंभात शार्दूल आपल्या कुटुंब आणि मित्रमंडळींच्या सोबत झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसला.
शार्दूल ठाकूरचा हळदीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.