JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / शेन वॉर्नचा 52 व्या वर्षी मृत्यू; लव, सेक्स आणि ड्रग्ज या कारणांसाठी वर्ल्ड कपमधूनही एकदा झाली होती हकालपट्टी

शेन वॉर्नचा 52 व्या वर्षी मृत्यू; लव, सेक्स आणि ड्रग्ज या कारणांसाठी वर्ल्ड कपमधूनही एकदा झाली होती हकालपट्टी

ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज शेन वॉर्नचा वयाच्या (Shane warn died) 52 व्या वर्षीच मृत्यू झाला आहे. वॉर्न त्याच्या घरातच बेशुद्धावस्थेत दिसला. Heart Attack मृत्यूचं कारण असल्याचं समोर येत आहे.

0108

स्पिन गोलंदाजीचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू शेन वॉर्न वयाच्या 52 व्या वर्षी कायमचा जग सोडून गेला.

जाहिरात
0208

या महान क्रिकेटपटूच्या अचानक जाण्याने ऑस्ट्रेलियासह जगभरातल्या क्रिकेट रसिकांना धक्का बसला आहे. पण शेन वॉर्नचं व्यक्तिमत्त्व पहिल्यापासूनच चर्चेत राहणारं आणि वादग्रस्त होतं.

जाहिरात
0308

क्रिकेटच्या मैदानावर केवळ आपल्या फिरकीच्या जोरावर मोठमोठ्या फलंदाजांना पळता भुई थोडी केली. पण हा ऑस्ट्रेलियन खेळाडू जेवढा मैदानावर प्रसिद्ध होता, तेवढाच मैदानाबाहेरही.

जाहिरात
0408

आपल्या रंगीन सवयींमुळं शेन वॉर्नला वर्ल्ड कपलाही मुकावे लागले होते. 2003 साली विश्वकप संघाची घोषणा केल्यानंतर, अव्वल क्रमांकावर असलेल्या या गोलंदाजाला ड्रग्ज घेतल्याप्रकरणी आरोपी ठरवण्यात आले होते. वॉर्ननं प्रतिबंधित डायूरेटिक्स या ड्रग्जचं सेवन केलं होतं. त्यामुळं त्याला मायदेशी परतावं लागलं होतं.

जाहिरात
0508

1994च्या ऑस्ट्रेलिया, श्रीलंका मालिकेदरम्यान शेन वॉर्नवर मॅच फिक्स केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याच्यासोबत ऑस्टेलियाचा तेव्हाचा कर्णधार मार्क वॉवरही आरोप करण्यात आला होता.

जाहिरात
0608

ऑस्टेलियाचा लेग स्पिनर याआधी अनेक विवादांमुळं अडचणीत आला होता. भारतीय सट्टेबाजाकडून पैसे घेतले होते. एवढेच नाही तर, त्याला लेडीज मॅनया नावानं ओळखला जायचा. 2000मध्ये एका नर्ससोबत गैरवतर्णुक केल्याचा आरोप शेन वॉर्नवर करण्यात आला होता.

जाहिरात
0708

तर, 2017ला पॉर्नस्टार वलरिया फॉक्स हिनं विनयभंगाचा आरोप केला होता. त्याआधी 2007साली वॉर्नची पत्नीनं त्याला घटस्पोट दिला होता. मात्र, त्यानंतर ते पुन्हा एकत्र आले पण वॉर्न त्यावेळी ब्रिटीश अभिनेत्री लिज हर्ले हिच्या सोबत असल्यानं त्याच्या पत्नीनं फसवल्याचा आरोप केला होता.

जाहिरात
0808

2018साली वॉर्ननं नॉट स्पिन नावाचं आपलं आत्मचरित्र प्रसिद्ध केलं होतं. दरम्यान या पुस्तकात तो काहीच खरं बोलला नसल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या