JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / Shane Warne Death : रक्ताचे डाग, जर्मन महिला आणि आता मसाज गर्ल, शेन वॉर्न प्रकरणात काय काय झालं?

Shane Warne Death : रक्ताचे डाग, जर्मन महिला आणि आता मसाज गर्ल, शेन वॉर्न प्रकरणात काय काय झालं?

ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्न (Shane Warne Death) याचा 4 मार्चला थायलंडमध्ये मृत्यू झाला, त्यानंतर या प्रकरणात वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत.

0107

ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne Death) याचं 52व्या वर्षी निधन झालं. थायलंडमधल्या एका व्हिलामध्ये शेन वॉर्नचा मृत्यू झाला. थायलंडमध्ये वॉर्न सुट्टीसाठी गेला होता. शेन वॉर्नच्या मृत्यूप्रकरणी वेगवेगळ्या अपडेट येत आहेत. पोलिसांचा तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट यांच्यात वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर नेमकं काय झालं, याबाबत माहिती घेऊया.

जाहिरात
0207

शेन वॉर्नचा मृत्यू 4 मार्चला झाला होता. तेव्हा तो थायलंडच्या एका व्हिलामध्ये सुट्टीसाठी आला होता. शेन वॉर्नचा मृत्यू हार्ट एटॅकने झाला. थायलंड पोलिसांच्या मते वॉर्नला जेव्हा हार्ट एटॅक आला तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला सीपीआर दिला, त्याचवेळी वॉर्नच्या तोंडातून रक्त यायला लागलं, त्यामुळे रूममध्ये रक्त सांडलं. (Photo- PTI Instagram)

जाहिरात
0307

शेन वॉर्नला जेव्हा ऍम्ब्युलन्समध्ये नेण्यात आलं तेव्हाच त्याचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं, असं पोलिसांनी सांगितलं. शेन वॉर्नला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना ऍम्ब्युलन्सजवळ एक जर्मन महिला उभी होती. वॉर्नच्या पार्थिवाजवळही ही महिला उपस्थित होते, त्यामुळे थायलंड पोलिसांनी या महिलेची चौकशी केली, ही महिला शेन वॉर्नची फॅन होती. (Photo- PTI Instagram)

जाहिरात
0407

याशिवाय शेन वॉर्न राहत असलेल्या सामुजान व्हिलाचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतलं. यामध्ये शेन वॉर्नच्या मृत्यूआधी काही महिला तिकडे आल्या होत्या हे दिसत आहे. शेन वॉर्न आणि त्याच्या मित्रांनी या महिलांना मसाजसाठी बोलावलं होतं. (Photo- PTI Instagram)

जाहिरात
0507

शेन वॉर्नच्या रूमजवळ आम्ही गेला तेव्हा कोणीही दार उघडत नव्हतं, असा दावा मसाजसाठी आलेल्या एका महिलेने केला आहे. शेन वॉर्नच्या खोलीतून जेव्हा दरवाजा उघडण्यात आला नाही, तेव्हा याबाबत आम्ही आमच्या बॉसला सांगितल्याचंही ही महिला म्हणाली. (Photo- PTI Instagram)

जाहिरात
0607

शेन वॉर्नच्या मृत्यूची माहिती मिळाली तेव्हा या चार महिला रिसॉर्टमधून बाहेर पडल्या, असं सीसीटीव्हीमधून समोर आलं आहे. पण यातल्या दोन महिलांनी शेन वॉर्नच्या मित्रांचा मसाज केला. शेन वॉर्नजवळ मात्र यातली एकही महिला जाऊ शकली नव्हती. (Photo- PTI Instagram)

जाहिरात
0707

शेन वॉर्नच्या मृत्यूमध्ये काहीही गडबड नसल्याचं थायलंड पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पोस्टमॉर्टममध्येही वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचं सांगण्यात आलं आहे. (Photo- PTI Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या