JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Shardul Thakur Wedding : शार्दुलच्या लग्नात क्रिकेट स्टार्सची हजेरी; संगीत कार्यक्रमात बेफाम होऊन नाचले

Shardul Thakur Wedding : शार्दुलच्या लग्नात क्रिकेट स्टार्सची हजेरी; संगीत कार्यक्रमात बेफाम होऊन नाचले

शार्दुलच्या विवाहातील कार्यक्रमांची धामधूम सुरु असून काल त्याचा संगीत कार्यक्रम पारपडला. या कार्यक्रमाला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर यांसह अनेक क्रिकेट स्टार्सनी हजेरी लावली होती.

जाहिरात

शार्दुलच्या लग्नात क्रिकेट स्टार्सची हजेरी; संगीत कार्यक्रमात बेफाम होऊन नाचले

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 फेब्रुवारी : भारताचा स्टार क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर आज विवाह बंधनात अडकणार आहे.   मैत्रीण मिताली परुळकरला अनेक वर्ष डेट केल्यानंतर शार्दूल तिच्या सोबत आज सातफेरे घेणार आहे. 25 फेब्रुवारी पासून शार्दुलच्या विवाहातील कार्यक्रमांची धामधूम सुरु असून काल त्याचा संगीत कार्यक्रम पारपडला. या कार्यक्रमाला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर यांसह अनेक क्रिकेट स्टार्सनी हजेरी लावली. शार्दूल ठाकूर याचा विवाह कर्जत येथील एका फार्महाउसवर होणार असून याला दोघांच्या कुटुंबातील 200 ते 250 जण उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी काल शार्दूल आणि मितालीच्या विवाहा निमित्त संगीत कार्यक्रम पारपडला. ज्यात कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह सोबत उपस्थित राहिला. तसेच शार्दूलचा खास मित्र श्रेयस अय्यर, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक तोमर देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

मिताली आणि शार्दुलच्या संगीत कार्यक्रमांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यात हे दोघेजण बॉलिवूड गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसतायत. काल श्रेयस अय्यर याने एका कार्यक्रमात शार्दूल ठाकूरसाठी ‘दोस्ती’ वर गाणं देखील गायलं होत. शार्दुलच्या लग्नातील कार्यक्रमांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून याची सध्या सर्वत्रच चर्चा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या