नवी दिल्ली, 30 मार्च : कोरोनाविरोधात (Coronavirus) लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) मदतीचं आवाहन केल्यानंतर विविध क्षेत्रातून मदतीचा ओघ येत आहे. अगदी सर्वसामान्यांपासून श्रीमंत, कलाकार, उद्योगपती मदत करीत आहे. यातच एका 15 वर्षाची शूटर इशा सिंह (Isha Singh) हिने रविवारी 30,000 रुपयांची मदत दिली आहे. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर ट्विट केलं आहे आणि माझ्या सेव्हिग्समधून हा 30000 रुपयांचा निधी देत असल्याचे तिने सांगितले. यावर केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी इशा सिंह हिचं कौतुक केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 15 वर्षांची असतानाही तू मदतीसाठी पुढे आलीस याबद्दल तुझं कौतुक आहे. तू Real Champion आहेत. याशिवाय एका अडीच वर्षाच्या मुलीनेही मोदींना मदत केल्याचं समोर आलं आहे. त्या चिमुरडीने आपल्या पिगी बॅग्समधील पैसे देत असल्याचं सांगितलं आहे.
क्रिकेटर सुरेश रैना (Suresh Raina) यांनी 31 लाख रुपयांचं दान पीएम-केअर्स आणि 21 लाख रुपये उत्तर प्रदेशातील आपात्कालीन विभागालं दिलं आहे. शुक्रवारी सचिन तेंडुलकर (Sachin Temdulkar) यांनी पीएम-केअर्सला (PM- Cares) 25 आणि मुख्यमंत्र्यांच्या मदत कक्षाला 25 लाख रुपयांची मदत केली. त्यानंतर हिमा दास (Hima Das) यांनी आसाम (Assam) सरकारन मदत करण्याच आश्वासन दिलं आहे. सर्वसामान्य देखील कोरोनाविरोधात उभ्या केलेल्या लढ्याला हातभार लावत आहे. ज्यांनी शक्य तितका निधी पीएम-केअर्सला दिला जात आहे.