भारतीय टीम इंग्लंडविरुद्ध (India vs England) जेव्हा मोटेराच्या मैदानात तिसरी टेस्ट खेळण्यासाठी उतरेल तेव्हा सगळ्यांची नजर ऑफ स्पिनर आर.अश्विन (R.Ashwin)वर असेल.
भारतीय टीम इंग्लंडविरुद्ध जेव्हा मोटेराच्या मैदानात तिसरी टेस्ट खेळण्यासाठी उतरेल तेव्हा सगळ्यांची नजर ऑफ स्पिनर आर.अश्विन (R.Ashwin)वर असेल. या मॅचमध्ये अश्विन एक मोठं रेकॉर्ड स्वत:च्या नावावर करू शकतो. अश्विनला भारताकडून सगळ्यात जलद 400 टेस्ट विकेट पूर्ण करण्याची संधी आहे. (Photo- AP)
अश्विनने आतापर्यंत 76 टेस्टमध्ये 394 विकेट घेतल्या आहेत. जर मोटेरावर त्याला आणखी 6 विकेट घेता आल्या तर तो सगळ्यात जलद 400 विकेट घेणारा भारतीय खेळाडू ठरेल. सध्या हे रेकॉर्ड अनिल कुंबळेच्या नावावर आहे. कुंबळेने 85 टेस्टमध्ये हा विक्रम केला होता. (Photo- AP)
सगळ्यात जलद 400 टेस्ट विकेट पूर्ण करण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. मुरलीधरनने 72 टेस्टमध्ये हा आकडा पार केला होता. मोटेरामध्ये 6 विकेट घेतल्या तर अश्विन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येईल. (Photo- Murlidharan Facebook)
रिचर्ड हॅडली आणि डेल स्टेन यांनी 80-80 टेस्टमध्ये 400 विकेट पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे अश्विन सहज हॅडली आणि स्टेन यांच्यापुढे जाऊ शकतो. मोटेरावरच अश्विन हा विक्रम मोडेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. (Photo- Dale Steyn Instagram)