JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / अश्विन-जडेजाची धमाल! एकत्र गाठला माईलस्टोन, अशी कामगिरी करणारी दुसरी भारतीय जोडी

अश्विन-जडेजाची धमाल! एकत्र गाठला माईलस्टोन, अशी कामगिरी करणारी दुसरी भारतीय जोडी

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीत दोघांनी एकूण 17 विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या कसोटीतही दोघे चांगली कामगिरी करत आहेत.

जाहिरात

अश्विन जडेजा जोडीची कमाल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 24 जुलै : गेल्या दहा वर्षांत रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडजे या जोडीने टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात या दोघांनी अडकवलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीत दोघांनी एकूण 17 विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या कसोटीतही दोघे चांगली कामगिरी करत आहेत. अश्विन आणि जडेजाने आणखी एक कमाल करताना मोठा विक्रम केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एकत्र खेळणताना 500 विकेट घेण्याची कामगिरी जडेजा आणि अश्विन यांनी केलीय. अशी कामगिरी करणारी अश्विन-जडेजा ही दुसरी भारतीय जोडी ठरलीय. त्यांनी त्रिनिदाद कसोटीत चौथ्या दिवशी हा टप्पा गाठला. अश्विनने वेस्ट इंडिजच्या दोन गड्यांना बाद करताच त्यांनी 500 विकेटचा माइलस्टोन गाठला. याआधी भारताकडून हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे यांच्या जोडीने अशी कमाल केली होती. सात्विक-चिरागची कमाल, वर्ल्ड नंबर वन जोडीला नमवत जिंकली कोरिया ओपन हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे 1990 आणि 2000चे दशक गाजवले. त्यांनी एकत्र 501 विकेट घेतल्या होत्या. या हरभजन सिंगने 220 तर अनिल कुंबळेने 281 गडी बाद केले होते. आता यांच्या क्लबमध्ये अश्विन-जडेजाने स्थान मिळवलं. 500 विकेटपैकी अश्विनने 274 तर जडेजाने 226 विकेट घेतल्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटीत चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. वेस्ट इंडिजला विजयासाठी 365 धावांचे आव्हान दिले आहे. प्रत्युत्तरादाखल खेळताना चौथ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजच्या 2 बाद 76 धावा झाल्या आहेत. आता भारताला अखेरच्या दिवशी विजयासाठी 8 विकेट तर वेस्ट इंडिजला विजयासाठी 289 धावांची गरज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या