विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने धमाकेदार कामगिरी केली आहे.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने धमाकेदार कामगिरी केली आहे. कर्नाटकविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये शॉने 122 बॉलमध्ये 165 रन केले. यात 17 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता. याशिवाय पृथ्वी शॉ या मोसमात 750 पेक्षा जास्त रन करणारा पहिला खेळाडू बनला आहे.
पृथ्वी शॉ याचं विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमातलं हे चौथं शतक आहे. या मोसमात त्याने सात मॅचमध्ये आत्तापर्यंत 754 रन केले आहेत. याचसोबत त्याने भारतीय खेळाडू मयंक अग्रवाललाही मागे टाकलं आहे. मयंकने 2018 साली 8 मॅचमध्ये 723 रन केले होते.
कर्णधार म्हणून शॉने लागोपाठ तिसऱ्या मॅचमध्ये 150 पेक्षा जास्त रनची खेळी केली आहे. पृथ्वीने पुदुच्चेरीविरुद्ध ग्रुप स्टेजमध्ये नाबाद 227 रनची खेळी केली होती. स्पर्धेच्या इतिहासातला हा सर्वाधिक स्कोअर होता. तर मंगळवारी त्याने आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय खेळाडूचा लिस्ट ए मधला सर्वाधिक स्कोअर केला. सौराष्ट्रविरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये पृथ्वी शॉ याने नाबाद 185 रन केले. याचसोबत त्याने धोनी आणि विराटलाही मागे टाकलं.
पृथ्वी शॉ याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 2 हजार रन पूर्ण केल्या. शॉने आतापर्यंत 40 लिस्ट ए मॅचमध्ये 8 शतकांसह 2,138 रन केले आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खराब कामगिरीनंतर पृथ्वी शॉला भारतीय टीममधून बाहेर करण्यात आलं होतं. हा डच्चू शॉच्या चांगलाच जिव्हारी लागला. विजय हजारे ट्रॉफीमधल्या या कामगिरीमुळे शॉची इंग्लंडविरुद्धच्या वनडे टीममध्ये निवड होऊ शकते.