JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / क्रीडा विश्वाला झटका, अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचे कोरोनामुळे निधन

क्रीडा विश्वाला झटका, अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचे कोरोनामुळे निधन

2001 मध्ये आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धा देशात आणण्यात या खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 जुलै : कोरोनाचा प्रसार देशात मोठ्या वेगानं होत आहे. कोरोनामुळं क्रीडा विश्वाला सगळ्यात मोठा झटका बसला आहे. अर्जुन पुरस्कार विजेते आणि दिग्गज पॅरा बॅडमिंटनपटू रमेश टिकाराम यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. भारतीय पॅरा बॅडमिंटनचे अध्यक्ष एनसी सुधीर यांनी ही माहिती दिली. सुधीर यांनी दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्हाला हे सांगण्यात अतिशय दु:ख होत आहे की, गुरुवारी दुपारी रमेश टिकाराम यांचे निधन झाले". सुधीर यांनी सांगितले की, 51 वर्षीय टिकाराम यांना ताप आणि खोकला होता आणि त्यांना 29 जूनला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. टिकाराम यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत.

2001 मध्ये आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धा देशात आणण्यात या खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे टिकाराम यांचे मित्र के व्हाय वेंकटेश यांनी सांगितले. तसेच, भारताची सध्याची पॅरा बॅडमिंटन खेळाडू दीपा मलिकनेही ट्वीट करत दु:ख व्यक्त केले.

दुसरीकडे देशात कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांच्या घरात गेली असून आज एकाच दिवसात तब्बल 35 हजार नवे रुग्ण सापडले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या