JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पाकिस्तानी अंपायर अलीम दार थोडक्यात बचावले, बुलेट थ्रो डोक्यावर आपटला, VIDEO

पाकिस्तानी अंपायर अलीम दार थोडक्यात बचावले, बुलेट थ्रो डोक्यावर आपटला, VIDEO

अबु धाबीमध्ये सुरू असलेल्या टी-10 लीगमध्ये (T10 League) पाकिस्तानी अंपायर अलीम दार (Aleem Dar) थोडक्यात बचावले आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अबु धाबी, 27 नोव्हेंबर : अबु धाबीमध्ये सुरू असलेल्या टी-10 लीगमध्ये (T10 League) पाकिस्तानी अंपायर अलीम दार (Aleem Dar) थोडक्यात बचावले आहेत. चेन्नई ब्रेव्हस आणि नॉर्दन वॉरियर्स (Chennai Braves vs Northen Warriors) यांच्यात झालेल्या सामन्यात दार यांच्या डोक्यावर जलद गतीने येणारा थ्रो लागला. या सामन्यात नॉर्दनचे बॅटर केनार लुईस आणि मोईन अली (Moeen Ali) यांनी 19 बॉलवर प्रत्येकी 49-49 रन केले. नॉर्दनने निर्धारित 10 ओव्हरमध्ये 152 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने 133 रन केले ज्यामुळे त्यांचा 19 रनने पराभव झाला. केनारला प्लेयर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. या सामन्यात फोर आणि सिक्सचा पाऊस पडला. टी-10 लीगच्या या सामन्यात बॉलर्सची धुलाई झाली, पण मॅचमधला सगळ्यात भयावह क्षण अंपायरचं जखमी होणं होतं. डोक्याला बॉल लागल्यामुळे अलीम दार यांना दुखापत झाली. पहिल्या इनिंगच्या पाचव्या ओव्हरमध्ये फिल्डरने दुसऱ्या फिल्डरला बॉल देण्यासाठी फेकला, तेव्हा अलीम दार यांच्या डोक्याला बॉल लागला.

53 वर्षांचे अलीम दार बॉलपासून वाचण्यासाठी पळत होते, तेव्हा त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला बॉल लागला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. बॉल बाऊन्स झाल्यामुळे त्याचा वेग कमी झाला. तरीही काही काळ ते डोकं चोळत होते. नॉर्दन वॉरियर्सच्या फिजियोनी अलीम दार यांची तपासणी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या