JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ऐन मुलाखतीत पाकिस्तानी क्रिकेटरने ओढले गाल, महिला अँकर सोबत घडली विचित्र घटना

ऐन मुलाखतीत पाकिस्तानी क्रिकेटरने ओढले गाल, महिला अँकर सोबत घडली विचित्र घटना

पाकिस्तानात सध्या पाकिस्तान सुपर लीग ही क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. सध्या पीएसएल मधील एका सामन्यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यात कॅमेरासमोर ऐन मुलाखत सुरु असताना महिला अँकरच्या समोर एक विचित्र घटना घडली.

जाहिरात

ऐन मुलाखतीत पाकिस्तानी क्रिकेटरने ओढले गाल, महिला अँकर सोबत घडली विचित्र घटना

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 फेब्रुवारी : भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानात सध्या पाकिस्तान सुपर लीग ही क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळत असून यात अनेक धम्माल किस्से देखील घडत आहेत. सध्या पीएसएल मधील एका सामन्यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यात कॅमेरासमोर ऐन मुलाखत सुरु असताना महिला अँकरच्या समोर एक विचित्र घटना घडली. इस्लामाबाद युनायटेड आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स या दोन संघांमध्ये सामना पारपडला. या सामन्यात इस्लामाबादने क्वेटाचा 63 धावांनी पराभव केला. क्रिकेटर आझम खानच्या तडफदार खेळीमुळे इस्लामाबादने 6 विकेट गमावून 220 धावा केल्या होत्या. परंतु प्रत्युत्तरात क्वेटाचा संघ केवळ 157 धावा करू शकला.  या सामन्यात आझम सामनावीर ठरला. यावेळी महिला अँकर झैनाब अब्बास विजयानंतर मैदानात कॅमेऱ्यासमोर आझमची मुलाखत घेत होती.

संबंधित बातम्या

कॅमेऱ्यावर मुलाखत सुरु असताना अचानकपणे इस्लामाबाद संघातील क्रिकेटर हसन अली त्यांच्या दिशेने धावत आला आणि त्याने उत्साहाच्या भरात आझमचे गाल ओढून निघून गेला. काही सेकंड महिला अँकर थबकली, तिला नक्की काय घडले कळलेच नाही. आणि तिचा एकाच हशा पिकाला. या घटनेत महिला अँकर झैनाब हिच्यावर हसन आदळणारच होता पण तेवढ्यात झैनाबने हाताने त्याला पटकन थांबवले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाकिस्तानमध्ये काहीही होऊ शकत अश्या प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या