JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / T20 World Cup : न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची लाज का गेली? ही 5 कारणं ठरली गेम चेंजर

T20 World Cup : न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची लाज का गेली? ही 5 कारणं ठरली गेम चेंजर

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 स्टेजच्या मुकाबल्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला. या पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलमध्ये पोहोचणं आणखी कठीण झालं आहे.

0106

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 स्टेजच्या मुकाबल्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला. टॉस हरल्यानंतर भारतीय टीम पहिले बॅटिंगला आली, पण 20 ओव्हरमध्ये टीमला 7 विकेट गमावून 110 रन करता आले. न्यूझीलंडने 111 रनच्या आव्हानाचा पाठलाग 14.3 ओव्हरमध्येच फक्त दोन विकेट गमावून केला. टीम इंडियाच्या या लाजिरवाण्या पराभवासाठी पाच प्रमुख कारणं ठरली.

जाहिरात
0206

विराटने टॉस गमावला : या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराटने लागोपाठ दुसऱ्यांदा टॉस गमावला. याआधी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही विराटने टॉस गमावला होता. जानेवारी 2019 पासून आतापर्यंत विराट सर्वाधिक टॉस गमावणारा कॅप्टन आहे. या स्पर्धेत आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या टीम वारंवार मॅच जिंकत आहेत, काण दुसऱ्या इनिंगमध्ये धुकं महत्त्वाची भूमिका बजावतं. मैदानात दव आल्यामुळे बॉलरना बॉल हातात पकडण्यात अडचणी येतात, त्यामुळे आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या टीमला बॅटिंग सोपी होऊन जाते.

जाहिरात
0306

ईशानवर जुगार खेळणं पडलं महागात : न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) ईशान किशन (Ishan Kishan) केएल राहुलसोबत (KL Rahul) ओपनिंगला बॅटिंगसाठी आला. हे दोघं बॅटिंगसाठी मैदानात येत असल्याचं बघून कॉमेंट्री करत असलेल्या मुरली कार्तिक आणि सायमन डूल यांनीही आश्चर्य व्यक्त केलं. विराट कोहलीचा हा निर्णय टीम इंडियाला चांगलाच महागात पडला. कारण इशान किशन मॅचच्या 17 व्या बॉलला 4 रन करून आऊट झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर 4 शतकं आहेत. ही चारही शतकं रोहितने ओपनिंगला खेळून केली आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. एवढं शानदार रेकॉर्ड असतानाही विराटने ही रणनिती का अवलंबली, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

जाहिरात
0406

रोहित-कोहलीने फेकल्या विकेट : रोहित शर्मा या मॅचमध्ये तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आला. रोहित पहिल्याच बॉलला आऊट झाला असता, पण फाईन लेगवर उभ्या असलेल्या एडम मिल्ने याने रोहितचा सोपा कॅच सोडला. यानंतर रोहितला जीवनदान मिळालं, पण त्याला त्याचा फायदा उचलता आला नाही. ईश सोढीच्या बॉलिंगवर रोहितने मार्टिन गप्टीलला कॅच दिला. यानंतर कोहलीनेही (Virat Kohli) मिड विकेटच्या वरून ईश सोढीला सिक्स मारण्याचा प्रयत्न केला, पण बोल्टने विराटला कॅच आऊट केलं. या दोघांपैकी एकाला 20 ओव्हर टिकणं गरजेचं होतं, पण दोघांनी बेजबाबदार शॉट खेळले.

जाहिरात
0506

भारतीय टीमने 120 पैकी 54 बॉलवर एकही रन केली नाही. याशिवाय भारतीय खेळाडूंना फक्त 8 फोर आणि 2 सिक्स मारता आल्या. मॅचदरम्यान एक वेळ अशीही आली जेव्हा टीम इंडियाला लागोपाठ 71 बॉल एकही बाऊंड्री मारता आली नाही. भारतीय खेळाडूंना सहाव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर फोर मारता आली यानंतर 17 व्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर फोर गेली.

जाहिरात
0606

मॅचच्या सुरुवातीलाच ट्रेन्ट बोल्टने आपणही पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीसारखी बॉलिंग करून टीम इंडियाला त्रास देऊ असा इशारा दिला होता. बोल्टचा हा इशारा खरा ठरला. त्याने ईशान किशन, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूरची विकेट घेतली. तर ईश सोढीने रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. मिचेल सॅन्टनरला 4 ओव्हरमध्ये एकही विकेट मिळाली नसली, तरी त्याने फक्त 15 रन दिल्या आणि एक बाजू लावून धरली. भारतीय खेळाडूंना सॅन्टनर आणि ईश सोढी या दोन्ही स्पिनरसमोर एकही फोर मारता आली नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या