JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / धोनीच्या फार्म हाऊसवर आला नवीन पाहुणा, झिवाने शेयर केला क्युट PHOTO

धोनीच्या फार्म हाऊसवर आला नवीन पाहुणा, झिवाने शेयर केला क्युट PHOTO

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) सोशल मीडियावर खूपच कमी ऍक्टीव्ह असतो, पण त्याच्याबाबतच्या बातम्या, फोटो किंवा व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रांची, 3 जून : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) सोशल मीडियावर खूपच कमी ऍक्टीव्ह असतो, पण त्याच्याबाबतच्या बातम्या, फोटो किंवा व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात. आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर धोनी रांचीच्या आपल्या घरात कुटुंबासोबत राहत आहे. कधी धोनीचा घोडा चर्चेत असतो तर कधी कुत्रा. आता धोनीच्या फार्म हाऊसवर नवा पाहुणा आला आहे. धोनीची मुलगी झिवाने (Ziva Dhoni) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेयर केला आहे, या फोटोमध्ये ती एका छोट्या पांढऱ्या रंगाच्या घोड्यासह दिसत आहे. या फोटोमध्ये झिवाने घोड्याच्या डोक्यावर हात ठेवला आहे. तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये काहीही लिहिलेलं नाही. फक्त हृदयाचा इमोजी टाकला आहे. या फोटोला आतापर्यंत 1.5 लाख जणांनी लाईक केलं आहे.

संबंधित बातम्या

याआधी धोनीने चेतक नावाचा घोडा विकत घेतला होता. धोनीची पत्नी साक्षीने या घोड्याचा व्हिडिओ शेयर केला आणि तो कुटुंबाचा एक सदस्य असल्याचं सांगितलं. तसंच तिने धोनी घोड्याला मसाज करत असल्याचा फोटोही साक्षीने शेयर केला होता. आयपीएल स्थगित झाल्यानंतर धोनी त्याच्या कुटुंबासोबत पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवत आहे. बीसीसीआयने आयपीएलचा उरलेला मोसम युएईत सप्टेंबर महिन्यात खेळवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे धोनी पुन्हा युएईला रवाना होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या