धोनीचा अनोखा अंदाज, फॉर्म हाऊसवर खास दोस्तांसोबत कापला केक, VIDEO
मुंबई, 8 जुलै : भारताचा माजी क्रिकेटर एम एस धोनी याने काल त्याचा 42 वा वाढदिवस साजरा केला. धोनीच्या वाढदिवसानिमित्त जगभरातील चाहत्यांनी वेगवगेळ्या माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान धोनीने शनिवारी त्याच्या सोशल मीडियावर एक क्यूट व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले. महेंद्रसिंह धोनी हा प्राणी प्रेमी असून त्याच्या रांची येथील फार्म हाऊसवर घोड्यांपासून ते विविध प्रजातीच्या श्वानांपर्यंत अनेक प्राणी आहेत. धोनी अनेकदा त्याच्या पाळीव प्राण्यांची स्वतःहून काळजी घेताना अनेकदा दिसतो. अनेक क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताइद असणारा धोनी काल 42 वर्षांचा झाला. एकीकडे त्याचे चाहते विविध पद्धतीने त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करत असताना धोनीने मात्र त्याच्या लाडक्या श्वानांसह वाढदिवस साजरा केला.
धोनीने शनिवारी त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत धोनी फार्म हाऊसवरील श्वानांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करताना दिसला. धोनीचे चाहते त्याच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.