चौथ्या कसोटीत श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीवरून सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल
मुंबई, 12 मार्च : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. आज या सामन्याचा चौथा दिवस असून दिवसाअंती भारत या सामन्यात 88 धावांनी आघाडीवर आहे. परंतु अशातच भारतीय संघाला श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे मोठा धक्का बसला. श्रेयस त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे आज मैदानावर खेळू शकला नाही. तेव्हा त्याच्या सामन्यातील अनुपस्थितीवरून सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल होत आहेत. भारतीय संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा कसोटी सामना फार महत्त्वाचा आहे. दरम्यान, भारताचा मधल्या फळीतला फलंदाज श्रेयस अय्यर पाठदुखीने त्रस्त असून आज तो फलंदाजीला उतरला नाही. बीसीसीआयने सांगितले की, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरने पाठ दुखत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर अय्यरला स्कॅनिंगसाठी नेण्यात आलं.
बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्यावर देखरेख करत आहे. आज श्रेयसच्या अनुपस्थितीत विराट कोहली, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांनी संघासाठी चांगली कामगिरी केली. परंतु श्रेयस अय्यर खेळला असता तर संघाला अधिक लीड मिळवून देण्यास मदत झाली असती. अशातच श्रेयस अय्यरवरून नेटकरी सोशल मिडीआयवर मिम्स शेअर करीत आहेत.
सध्या हे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असून श्रेयस अय्यरचा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करीत आहेत.