मुंबई, 5 मे : स्पोर्ट्स एँकर (Anchor) आणि भारतीय क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नी याची पत्नी मयंती लँगरला (Mayanti Langer) सोशल मीडियावर एका ट्रोलरने ट्रोल (Troll) करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मयंतीने त्या ट्रोलरला अत्यंत साधेपणाने आणि सूचक उत्तर देत त्याचं तोंड बंद केलं. मयंतीच्या उत्तरानंतर बहुतेक त्या ट्रोलरला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तुम्हाला टीव्हीवर परतण्याची वाट बघतोय, अशी कमेंट त्याने केली. कोरोनाची (Corona) भयावह स्थिती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे गरज नसेल तेव्हा घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रत्येकाला दिला जात आहे. हा संदेश सेलिब्रिटी देखील आपपल्या पध्दतीने देण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच काहीसा प्रयत्न मयंतीने केला. कोरोना अनुषंगाने मयंती लँगरने 27 एप्रिलला एक ट्वीट केलं होतं. यावेळी तिने आपला पती आणि मुलासोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोत ती आपल्या बाळाला कडेवर घेत त्याचे चुंबन घेत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, सुरक्षित रहा, घरीच रहा, मास्क वापरा, अनेक लोकांची जबाबदारी तुमच्यावर आहे. चला एकत्र येऊन हे करु. हे ट्वीट करताना तिने MaskupIndia आणि StayHomeStaySafe हे टॅग्ज देखील वापरले आहेत. या ट्वीटवर ट्रोलरने कमेंट केली. कोणत्या जागी कोणता फोटो लावाला याचा काही सेन्स असतो. यावर मयंतीने रिप्लाय देत कमेंट केली की मित्रा, मी घरीच आहे. मंयतीच्या या रिप्लायवर ट्रोलरने पुन्हा रिप्लाय दिला, एखादा अन्य दिवस असता तर मी तुमच्या फोटोची प्रशंसा केली असती. परंतु, सध्या देशातील कोरोनाची भयावह स्थिती डोक्यात आहे. तुम्ही टीव्हीवर परतण्याची वाट पाहतोय. या युझर व्यक्तिरिक्त अन्य युझर्सने देखील क्रिकेट तज्ज्ञ म्हणून आम्हाला तुमची कमतरता जाणवतेय, अशा कमेंटस केल्या आहेत.
मयंती लँगरने 2020 मध्ये मुलाला जन्म दिला. मयंतीने त्यावेळी आपला पती आणि बाळासोबतचा फोटो सोशल मिडीयावर शेअर करीत ही गोड बातमी दिली होती. या कारणामुळे मयंती आयपीएल 2020 च्या सिझनमध्ये अॅकरिंग करताना दिसली नाही. मयंतीचा पती आणि भारतीय ऑलराऊंडर स्टुअर्ट बिन्नी या च्या नावे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी रन्स देत 6 विकेट घेणारा भारतीय बॉलर, असा रेकॉर्ड आहे. स्टुअर्ट बिन्नीने 2014 मध्ये बांगलादेश विरुध्दच्या वनडेमध्ये 4 रन्स देत 6 विकेट घेतल्या आहेत.