मुंबई, 02 एप्रिल : 2 एप्रिल 2011 म्हणजे भारतीय क्रिकेट चाहत्यांची स्वप्नपूर्वी. तब्बल 28 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताने वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मुंबईच्या वानखेडे मैदानावर मारलेला तो विजयी षटकार आजही सर्वांच्या स्मरणात आहे. आज भारताने वर्ल्ड कप जिंकून 9 वर्ष पूर्ण झाली. मात्र लॉकडाऊनमुळे क्रिकेट चाहते या विजयाचा उत्साह साजरा करू शकत नाही, म्हणून सध्या सोशल मीडियावर वर्ल्ड कपबाबत भन्नाट ट्रेंड सुरू झाले आहेत. मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग लवकर बाद झाल्यानंतर, भारताचा डाव सांभाळला तो गौतम गंभीरने. त्यानंतर धोनीने नेहमी प्रमाणे हेलिकॉप्टर श़ॉटने सामन्यांची विजयी सांगता केली. दरम्यान, सध्या लॉकडाऊनमध्ये घरात असलेल्या चाहत्यांनी ट्वीटरवर एक अनोखा ट्रेंड सुरू केला आहे. यात तुम्ही धोनीने षटकार मारला तेव्हा काय करत होतात? असा सवाल एकमेकांना विचारला जात आहे.
ट्विटरवर ट्रेंड धोनीचा षटकार म्हंटल की आजही रवी शास्त्री यांचा आवाज ऐकू येत आहे. ‘धोनीने आपल्या स्टाईलमध्ये सामना संपला’, हे शब्द क्रिकेट चाहत्यांच्या मनावर कोरले गेले आहे. ट्विटरवर हाच ट्रेंड चालू आहे. ज्यामध्ये जेव्हा धोनीने षटकाराने संघाला विजय मिळवून दिला तेव्हा आपण कुठे होता असे विचारले जात आहे. गुरुवारी रात्री 12 वाजेपासून चाहते हे सतत ट्रेंड करत आहेत.
धोनी आणि गंभीरची विजयी खेळी 2011च्या वर्ल्ड कपमध्ये धोनीने शेवटच्या सामन्यात एक अविस्मरणीय षटकार खेचला होता, सचिन तेंडुलकर, झहीर खान, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग या दिग्गजांसह भारतीय संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळत होता. 2007 साली धोनीने संघाला प्रथम टी -20 चॅम्पियन बनवले होते. केवळ एक सामना गमावत भारत अंतिम सामन्यात पोहचला होता. उपांत्या सामन्यात भारताने कट्टर वैरी असलेल्या पाकिस्तानला हरवले होते. श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत भारताला 275 धावांचे लक्ष्य दिले. भारताची सलामीची जोडी काही आश्चर्यकारक कामगिरी करू शकली नाही. सचिन 18 तर सेहवाग पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात गौतम गंभीरने 122 चेंडूत 97 धावांची शानदार खेळी खेळल्यानंतर विराट कोहलीबरोबर महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यानंतर धोनी क्रीजवर आला आणि शेवटपर्यंत थांबला. भारताला विजयासाठी 11 चेंडूत 4 धावांची गरज होती, त्यानंतर धोनीने षटकार मारत संपूर्ण देशाला आनंद साजरा करण्याची संधी दिली.