JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / द्रविड खेळाडूच नाही तर कोचही तयार करतोय, या खेळाडूंचं NCA मध्ये ट्रेनिंग पूर्ण

द्रविड खेळाडूच नाही तर कोचही तयार करतोय, या खेळाडूंचं NCA मध्ये ट्रेनिंग पूर्ण

भारताच्या युवा क्रिकेटपटूंना घडवण्यासाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) कठोर मेहनत घेत असल्याचं क्रिकेट चाहत्यांना माहिती आहे, पण द्रविड एनसीएमध्ये (NCA) भारतासाठी प्रशिक्षकही घडवत आहे.

0105

भारताच्या युवा क्रिकेटपटूंना घडवण्यासाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) कठोर मेहनत घेत असल्याचं क्रिकेट चाहत्यांना माहिती आहे, पण द्रविड एनसीएमध्ये (NCA) भारतासाठी प्रशिक्षकही घडवत आहे. मागच्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्त झालेला इरफान पठाण कोचिंग क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी तयार आहे. पठाणने एनसीएमध्ये बीसीसीआयकडू आयोजित करण्यात आलेला 8 दिवसांचा लेव्हल हायब्रिड कोचेस कोर्स पूर्ण केला. (Irfan Pathan Instagram)

जाहिरात
0205

जम्मू काश्मीर क्रिकेटचा मेंटर राहिलेल्या इरफान पठाणने एक पोस्ट शेयर केली, यात त्याने राहुल द्रविडचेही आभार मानले. पठाणने यासोबत एक फोटोही शेयर केला. (Irfan Pathan Instagram)

जाहिरात
0305

या फोटोमध्ये युसूफ पठाण, नमन ओझा, अभिषेक नायर, अशोक डिंडा, व्हीआरव्ही सिंग आणि परवेज रसूल यांच्यासह अनेक माजी भारतीय क्रिकेटपटू दिसत आहेत. (Irfan Pathan Instagram)

जाहिरात
0405

ट्रेनिंगमध्ये मार्गदर्शन करणाऱ्या एनसीए प्रमुख राहुल द्रविडसह पठाणने इतर सदस्यांनाही धन्यवाद दिले. एनसीए बीसीसीआयचा लेव्हल 2 हायब्रिड कोर्स पूर्ण केला आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे, असं इरफान म्हणाला. (Irfan Pathan Instagram)

जाहिरात
0505

मी राहुल भाई आणि इतर सदस्यांचे आभार मानतो, कारण माझ्यासह सगळ्या खेळाडूंना 8 दिवस दर्जेदार ट्रेनिंग देण्यात आलं, अशी प्रतिक्रिया इरफानने दिली. 2003-2004 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पठाणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. (Irfan Pathan Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या