JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / यशस्वी जैसवालचं दुसऱ्या डावात शतक, इराणी कपमध्ये घडवला इतिहास

यशस्वी जैसवालचं दुसऱ्या डावात शतक, इराणी कपमध्ये घडवला इतिहास

इराणी कपमध्ये शेष भारताकडून खेळताना यशस्वी जैसवालने पहिल्या डावात द्विशतक तर दुसऱ्या डावात शतक झळकावलंय.

जाहिरात

yashaswi jaiswal

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 04 मार्च : शेष भारत आणि मध्य प्रदेश यांच्यात इराणी कप स्पर्धेत एकमेव सामना सुरू आहे. या सामन्यात यशस्वी जैसवालने जबरदस्त फलंदाजी केली. पहिल्या डावात द्विशतक करणाऱ्या यशस्वीने दुसऱ्या डावात शतक केलं. यासह त्याने इराणी कपच्या एका सामन्यात द्विशतक आणि शतक करणारा तो पहिलाच फलंदाज ठऱला आहे. यशस्वी जैसवालचं हे शतक कठीण अशा परिस्थितीत संघाला भक्कम धावसंख्या उभारू देण्यास महत्त्वाचं ठरलं. एका बाजूला फलंदाज बाद होत असताना दुसऱ्या बाजूने जैसवालने फटकेबाजी केली. त्याने अवघ्या 103 चेंडूत 13 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने शतक केलं. यशस्वीच्या नावावर आता या सामन्यात 300 पेक्षा जास्त धावा आहेत. इराणी कपमध्ये अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी भारताचा सलामीवीर शिखर धवनने अशी कामगिरी केली होती. त्याने एका सामन्यात 300 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 15 व्या सामन्यात यशस्वीने 8वे शतक झळकावले आहे. यात तीन द्विशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी आता 85 च्या वर पोहोचली आहे. हसावं की रडावं? DRS च्या निर्णयामुळे ट्रोल झाला तमीम इकबाल, पाहा VIDEO   यशस्वी जैसवाल पहिल्या डावात द्विशतक करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. त्याने या स्पर्धेत वयाच्या 21 व्या वर्षी द्विशतक केलं आहे. याआधी प्रवीण आमरे यांच्या नावावर हा विक्रम होता. त्यांनी 1990 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी द्विशतक झळकावलं होतं. इराणी कपमधील या सामन्यात शेष भारताने प्रथम फलंदाजी करताना जैसवालच्या फलंदाजीच्या जोरावर484 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना मध्य प्रदेशचा संपूर्ण संघ 294 धावात बाद झाला होता. 190 धावांची आघाडी घेतल्यानतंर शेष भारताने दुसऱ्या डावात लंच पर्यंत 391 धावांची आघाडी घेतली. तर यशस्वी जैसवाल 121 धावांवर खेळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या