JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / कोरोनाला घाबरले दिग्गज खेळाडू? आतापर्यंत 'या' 5 खेळाडूंनी घेतली IPLमधून माघार

कोरोनाला घाबरले दिग्गज खेळाडू? आतापर्यंत 'या' 5 खेळाडूंनी घेतली IPLमधून माघार

IPL सुरू होण्याआधीच सुरेश रैनासह ‘या’ 4 दिग्गज खेळाडूंनी घेतली माघार.

0107

यंदा आयपीएलचा तेरावा हंगाम दुबई, अबुधाबी आणि शारजाहला होणार आहे. 19 सप्टेंबरला पहिला सामना होणार असून 10 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 डबल हेडर्स सामने असणार आहे.

जाहिरात
0207

मात्र हे हंगाम सुरू होण्याआधीच काही दिग्गज खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे कोरोनाच्या संकटात होणाऱ्या या स्पर्धेला हे खेळाडूही घाबरलेले दिसत आहेत.

जाहिरात
0307

चेन्नई सुपरकिंग्जचा दिग्गज फलंदाज सुरैश रैनानं अचानक भारतात परतण्याचा निर्णय घेतला. रैनानं वैयक्तिक कारण सांगत आयपीएलचा तेरावा हंगाम खेळणार नसल्याचे सांगितले. अद्याप रैनाची जागा संघात कोण घेणार याबाबत CSK संघाने कोणतीही माहिती दिलेली नाही आहे.

जाहिरात
0407

चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा आणखी एक खेळाडू हरभजन सिंगनेही आयपीएल न खेळण्याचा निर्णय घएतला आहे. हरभजननेही वैयक्तिक कारण देत, युएइला न जाण्याचा निर्णय घेतला. CSK संघाने हरभजन संघची जागा कोण घेणार याबाबत माहिती मिळालेली नाही आहे.

जाहिरात
0507

इंग्लंडचा तुफानी ओपनर जेसन रॉय पाकिस्तानविरुद्ध झालेल्या टी-20 सामन्यादरम्यान जखमी झाला होता. नेट प्रॅक्टिस दरम्यान जेसनला दुखापत झाल्यामुळे त्यानं आयपीएलमधून माघार घेतली. जेसन दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत होता.

जाहिरात
0607

या यादीमध्ये मुंबई इंडिन्सच्या दिग्गज खेळाडूचेही नाव आहे. मुंबईचा स्टार गोलंदाज लसिथ मलिंगानं आयपीएलमधून माघार घेतली आहे. मलिंगाच्या जागी मुंबईनं संघात जेम्स पॅटिंन्सला जागा दिली आहे.

जाहिरात
0707

दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा आणखी एका इंग्लंडच्या खेळाडूनं आयपीएलमधून माघार घेतली आहे. क्रिस वोक्सनं वैयक्तिक कारण देत, युएइला न जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज अॅनरिक नोर्त्जेला जागा देण्यात आली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या