JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Auction 2022 : मुंबईपाठोपाठ भाऊ हार्दिकचाही कृणालला धक्का, तिसऱ्याच टीमकडून खेळणार आयपीएल

IPL Auction 2022 : मुंबईपाठोपाठ भाऊ हार्दिकचाही कृणालला धक्का, तिसऱ्याच टीमकडून खेळणार आयपीएल

आयपीएल 2022 च्या लिलावामध्ये (IPL Auction 2022) कृणाल पांड्याला (Krunal Pandya) मुंबई इंडियन्सच (Mumbai Indians) नाही तर त्याचा भाऊ हार्दिक पांड्यानेही (Hardik Pandya) धक्का दिला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बँगलोर, 12 फेब्रुवारी : आयपीएल 2022 च्या लिलावामध्ये (IPL Auction 2022) कृणाल पांड्याला (Krunal Pandya) मुंबई इंडियन्सच (Mumbai Indians) नाही तर त्याचा भाऊ हार्दिक पांड्यानेही (Hardik Pandya) धक्का दिला आहे. मुंबई आणि अहमदाबादने कृणाल पांड्यावर बोली लावली नाही. गुजरातने हार्दिक पांड्याला लिलावाआधी विकत घेतलं, तसंच त्याला टीमचा कर्णधारही केलं, त्यामुळे गुजरात कृणालवर बोली लावेल, असं बोललं जात होतं. कृणाल पांड्याचं नाव पुकारण्यात आलं तेव्हा चेन्नई आणि पंजाबने बोली लावायला सुरूवात केली, पण 6 कोटी रकमेपर्यंत गेल्यानंतर लखनऊने लिलावात एण्ट्री घेतली. लखनऊनेच कृणालला तब्बल 8.25 कोटी रुपये देऊन विकत घेतलं. हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) कृणालवर एकदा बोली लावली, पण त्यानंतर त्यांनीही माघार घेतली. कृणाल पांड्या आता आयपीएलच्या या मोसमात दीपक हुड्डासोबत लखनऊकडून खेळणार आहे. कृणाल पांड्या आणि दीपक हुड्डा यांच्यात बडोद्याकडून खेळताना मागच्या वर्षी वाद झाला होता, त्यानंतर हुड्डाने बडोद्याची साथ सोडली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या