JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2023 आधी Gujarat Titans 5 खेळाडूंना देणार डच्चू! वर्ल्ड चॅम्पियनवरही टांगती तलवार

IPL 2023 आधी Gujarat Titans 5 खेळाडूंना देणार डच्चू! वर्ल्ड चॅम्पियनवरही टांगती तलवार

गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आयपीएल 2022 (IPL 2022) ची चॅम्पियन झाली. पण तरीही पुढच्या मोसमात गुजरात टायटन्स काही खेळाडूंना रिलीज करण्याची शक्यता आहे.

0106

गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आयपीएल 2022 (IPL 2022) ची चॅम्पियन झाली. फायनलमध्ये त्यांनी राजस्थान रॉयल्सचा पराभव केला, यानंतर आता पुढच्या मोसमात त्यांचं लक्ष्य ट्रॉफी पुन्हा आपल्याकडेच ठेवण्यावर असेल. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात जेव्हा गुजरातची टीम पुन्हा मैदानात उतरेल तेव्हा काही खेळाडूंना डच्चू मिळू शकतो. Photo-IPL/BCCI

जाहिरात
0206

डावखुरा फास्ट बॉलर प्रदीप सांगवान (Pradeep Sangwan) 2018 नंतर पहिल्यांदाच आयपीएल खेळला. 3 सामन्यांमध्ये त्याला 3 विकेट मिळाल्या. टीममध्ये लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या असल्यामुळे प्रदीप सांगवानला फार संधीही मिळाली नाही, त्यामुळे पुढच्या मोसमात सांगवानचा पत्ता कट होऊ शकतो.

जाहिरात
0306

वरुण एरॉनही (Varun Aron) या मोसमात गुजरातकडून पहिल्या दोन मॅच खेळला. यात त्याने 30 बॉलमध्ये 52 रन दिले. फास्ट बॉलर असलेल्या वरुण एरॉनलाही पुढच्या हंगामात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

जाहिरात
0406

जयंत यादवही (Jayant Yadav) या मोसमात एकही सामना खेळला नाही, टीममध्ये दिग्गज खेळाडू असल्यामुळे जयंतला मैदानात उतरता आलं नाही. आयपीएल 2023 मध्ये जयंत यादवऐवजी गुजरात दुसऱ्या स्पिनरसाठी प्रयत्न करू शकते.

जाहिरात
0506

थ्रीडी प्लेयर म्हणून ओळखला जाणाऱ्या विजय शंकरने (Vijay Shankar) या मोसमात 4 मॅच खेळल्या, पण त्याला ना बॉलिंगमध्ये ना बॅटिंगमध्ये चमक दाखवता आली. या आयपीएलमध्ये त्याने फक्त 19 रन केल्या, तसंच त्याला एकही विकेट मिळाली नाही.

जाहिरात
0606

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मॅथ्यू वेड (Mathew Wade) यालाही आयपीएलमध्ये करिश्मा दाखवता आला नाही. 10 सामन्यांमध्ये त्याने 16 च्या सरासरीने 157 रन केले, 35 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर होता. ऑस्ट्रेलियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला त्या टीमचा वेड महत्त्वाचा सदस्य होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या