JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Auction 2022 : ऋतुराज मिळाला पण दुसरा पुणेकर धोनीच्या हातातून सटकला, SRH च्या मालकिणीने लावली इतकी बोली

IPL Auction 2022 : ऋतुराज मिळाला पण दुसरा पुणेकर धोनीच्या हातातून सटकला, SRH च्या मालकिणीने लावली इतकी बोली

आयपीएल स्पर्धेच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) पुणेकर खेळाडूला चांगलाच भाव मिळाला आहे. त्याला खरेदी करण्यासाठी धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) जोरदार प्रयत्न केले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बँगलोर, 12 फेब्रुवारी : आयपीएल स्पर्धेच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) पुणेकर खेळाडूला चांगलाच भाव मिळाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders) मागील सिझन गाजवलेल्या राहुल त्रिपाठीला (Rahul Tripathi) खरेदी करण्यासाठी जोरदार चुरस रंगली होती. महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) यापूर्वी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) 4 कोटींमध्ये रिटेन केले होते. ऋतुराजचा पुणेकर सहकारी असलेल्या राहुल त्रिपाठीला खरेदी करण्यासाठी देखील चेन्नईनं जोरदार प्रयत्न केले. एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या राहुलला खरेदी करण्यासाठी धोनीच्या टीमनं शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण, त्यांचे हे प्रयत्न अपूर्ण ठरले. अखेर सनरायझर्स हैदराबादनं (Sunrisers Hyderabad) राहुलला 8 कोटी 50 लाख रूपयांना खरेदी केले.

संबंधित बातम्या

राहुलनं आजवर 62 आयपीएल मॅचमध्ये 136.32 च्या स्ट्राईक रेटनं 1385 रन केले आहेत. तो ओपनिंगला तसेच मिडल ऑर्डरमध्येही खेळू शकतो. राहुल धोनीसोबत रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून खेळला आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईटरायडरमार्गे तो आता हैदराबादच्या टीममध्ये दाखल झाला आहे. IPL Auction 2022 : युजवेंद्र चहल करणार ‘हल्ला बोल’, नव्या रॉयल आर्मीत दाखल सनरायझर्स हैदराबादनं शनिवारी झालेल्या लिलावात निकोलस पूरन, प्रियम गर्ग, भुवनेश्वर कुमार, वॉशिंग्टन सुंदर तसंच टी. नटराजन यांना खरेदी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या