मुंबई, 13 फेब्रुवारी : आयपीएल 2022 स्पर्धेसाठीचे मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) आता पूर्ण झाले आहे. आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) टीम निश्चित झाली आहे. मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी अनुभवावर भर देणाऱ्या चेन्नईनं दुसऱ्या दिवशी नवोदीत खेळाडूंची खरेदी करत टीम तयार केली आहे. चेन्नईनं यंदाच्या ऑक्शनमध्ये दीपक चहरला (Deepak Chahar) 14 कोटींमध्ये खरेदी केले आहे. सध्या फॉर्मात असलेला चहर यापूर्वी देखील चेन्नईच्या टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. आयपीएल विजेतेपदामध्ये त्याचे योगदान होते. तसंच तो टीम इंडियाकडूनही सध्या चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याला चेन्नईनं विक्रमी किंमत देत खरेदी केले आहे. दीपक चहर प्रमाणेच ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू, रॉबिन उथप्पा, मिचेल स्टँनर, या जुन्या खेळाडूंना देखील चेन्नईनं खरेदी केले आहे. न्यूझीलंडचा बॅटर डेव्हॉन कॉनवेला (Devon Conway) चेन्नईनं 1 कोटींना खरेदी केले आहे. तो आता ऋतुराज गायकवाडसह चेन्नईचा ओपनर आहे. दीपक चहरचा बॉलिंगमधील पार्टनर म्हणून न्यूझीलंडच्या अॅडम मिल्नेचा (Adam Milne) चेन्नईनं समावेश केला आहे. टी20 क्रिकेटमधील अनुभवी बॉलर असलेल्या इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनला (Chris Jordan) चेन्नईनं शेवटच्या टप्प्यात खरेदी केले. महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईनं यंदा महाराष्ट्राच्या खेळाडूंवर मोठा विश्वास दाखवला आहे.पुणेकर राहुल त्रिपाठीला (Rahul Tripathi) घेण्याचा चेन्नईचा प्रयत्न अयशस्वी ठरला. पण त्यानंतरही ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगर्गेकर आणि प्रशांत सोळंकी हे 5 महाराष्ट्राचे खेळाडू चेन्नईच्या टीमकडून आगामी सिझनमध्ये खेळणार आहेत. IPL Auction 2021: फक्त 1 T20 मॅच खेळलेल्या मुंबईकरला धोनीनं केलं करोडपती चेन्नई सुपर किंग्सची संपूर्ण टीम : महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, अंबाती रायुडू रॉबिन उथप्पा, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर, ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिस्टोरियस, अॅडम मिल्ने, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगर्गेकर, प्रशांत सोळंकी, तुषार देशपांडे, सी. हरी निशांत, के. असिफ, शुभ्रांशू सेनापती, महेश थिकशाना, मुकेश चौधरी, नारायण जगदीशन, सिमरजीत सिंह आणि के. भगत वर्मा