JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2022 : वडील CEO, सासरे DGP, करोडपती आहे टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू!

IPL 2022 : वडील CEO, सासरे DGP, करोडपती आहे टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू!

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) मोसमाला 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे, त्याआधी 9 टीमनी त्यांचा कर्णधार जाहीर केला आहे. आता फक्त आरसीबीनेच कर्णधाराच्या नावाची घोषणा केलेली नाही,

019

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) मोसमाला 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे, तर फायनल 29 मे रोजी होणार आहे. आयपीएल महिनाभरावर आली असतानाच आयपीएलच्या 10 पैकी 9 टीमनी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली आहे. आरसीबी वगळता आयपीएलच्या सगळ्या टीमचे कर्णधार अखेर ठरले आहेत.

जाहिरात
029

सोमवारी पंजाब किंग्सने (Punjab Kings) मयंक अग्रवालला (Mayank Agarwal) टीमचा कर्णधार म्हणून जाहीर केलं. लिलावाआधी पंजाबने मयंकला 12 कोटी रुपयांना रिटेन केलं. पंजाबला अजूनपर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही, त्यामुळे मयंकच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

जाहिरात
039

मयंकचा जन्म 16 फेब्रुवारी 1991 ला कर्नाटकच्या बँगलोरमध्ये झाला. मयंकचे वडील अनुराग अग्रवाल हेल्थकेयर कंपनीमध्ये सीईओ आहेत, तर त्याची आई सुचित्रा सिंग गृहिणी आहेत.

जाहिरात
049

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार मयंक अग्रवालची एकूण संपत्ती 3.5 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास 26 कोटी रुपयांच्या आसपास आहे. बीसीसीआय वेतन, आयपीएल करार आणि वैयक्तिक व्यवसाय मिळून ही संपत्ती आहे.

जाहिरात
059

मयंक अग्रवाल बँगलोरमधल्या एक लक्झरी डिझायनर हाऊसचा मालकही आहे. तसंच त्याच्या नावावर देशात वेगवेगळ्या ठिकणी जमीन आणि घरंही आहेत. याशिवाय त्याच्याकडे लक्झरी कारही आहेत, यात मर्सिडीज एसयूव्हीचाही समावेश आहे.

जाहिरात
069

मयंकने त्याची लहानपणीची मैत्रीण आशिता सूदसोबत जून 2018 मध्ये लग्न केलं. आशिता व्यवसायाने वकील आहे. शाळेत असल्यापासूनच दोघं चांगले मित्र होते. या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. आशिताचे वडील प्रवीण सूद आधी पोलीस आयुक्त होते, आता ते कर्नाटकमध्ये डीजीपी आहेत.

जाहिरात
079

मयंकने आतापर्यंत 16 टेस्टमध्ये 43.30 च्या सरासरीने 1,429 रन केले आहेत, यात 4 शतकं आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. टेस्टमध्ये मयंकचा सर्वाधिक स्कोअर 243 रन आहे. टेस्टमध्ये त्याने 28 सिक्स आणि 178 फोर मारल्या आहेत.

जाहिरात
089

मयंकची वनडे कारकिर्द मात्र छोटी आहे. भारताकडून त्याने 5 वनडे खेळल्या यात त्याने 17.2 च्या सरासरीने 86 रन केले. 32 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे.

जाहिरात
099

आयपीएलमध्ये मयंकने 100 मॅच खेळल्या, यात त्याने 23.41 च्या सरासरीने 2,131 रन केले. मयंकच्या नावावर आयपीएलमध्ये एक शतक आणि 11 अर्धशतकं आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या