JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 Auction : 'अहमदाबाद'साठी आग्रही असणारा अदानी ग्रुप क्लीन बोल्ड, या कंपनीचा शेवटच्या बॉलवर सिक्स!

IPL 2022 Auction : 'अहमदाबाद'साठी आग्रही असणारा अदानी ग्रुप क्लीन बोल्ड, या कंपनीचा शेवटच्या बॉलवर सिक्स!

आयपीएलच्या दोन नव्या टीमची (IPL New Teams) घोषणा झाली आहे. अहमदाबाद (Ahmedabad) आणि लखनऊच्या (Lucknow) टीम पुढच्या मोसमापासून मैदानात उतरणार आहेत, त्यामुळे आयपीएलच्या एकूण टीमची संख्या 10 झाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 25 ऑक्टोबर : आयपीएलच्या दोन नव्या टीमची (IPL New Teams) घोषणा झाली आहे. अहमदाबाद (Ahmedabad) आणि लखनऊच्या (Lucknow) टीम पुढच्या मोसमापासून मैदानात उतरणार आहेत, त्यामुळे आयपीएलच्या एकूण टीमची संख्या 10 झाली आहे. आरपीएसजी ग्रुपने लखनऊची टीम तब्बल 7090 कोटी रुपयांना विकत घेतली, तर सीव्हीसी कॅपिटलला (CVC Capital) अहमदाबादची टीम 5,166 कोटी रुपयांना मिळाली. आयपीएल लिलावाच्या आधीपासूनच अदानी ग्रुप (Adani Group) अहमदाबादची टीम विकत घेण्यात यशस्वी होईल, असं सांगण्यात येत होतं, पण सीव्हीसी ग्रुपने हा लिलाव जिंकत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. कोण आहे सीव्हीसी कॅपिटल? सीव्हीसी कॅपिटल युकेमधली इनव्हेस्टमेंट फर्म आहे. या कंपनीने नुकतेच ला लिगामध्ये 10 टक्के मीडिया राईट्स विकत घेतले आहेत. याशिवाय फॉर्म्युला वन आणि रग्बी टीमही सीव्हीसी कॅपिटलच्या नावावर आहे. अहमदाबादच्या टीमसाठी अदानी ग्रुपने 5 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती, पण सीव्हीसी कॅपिटलने जवळपास 200 कोटी रुपयांपेक्षा जास्तचं टेंडर दिल्यामुळे त्यांच्या नावावर अहमदाबादची टीम झाली आहे.

संबंधित बातम्या

लखनऊची टीम सगळ्यात महाग आरपीएसजी ग्रुपने लखनऊच्या टीमवर यशस्वी बोली लावली. या टीमसाठी कंपनीने तब्बल 7090 कोटी रुपये मोजले, याचसोबत लखनऊची टीम आयपीएल इतिहासातली सगळ्यात महागडी टीम झाली आहे. अहमदाबाद, लखनऊ, कटक, धर्मशाला, गुवाहाटी आणि इंदूर या सहा शहरांमध्ये आयपीएलच्या नव्या टीमसाठीची स्पर्धा होती. प्रसिद्ध फूटबॉल क्लब मॅनचेस्टर युनायटेडचे मालक, अडानी ग्रुप (Adani Group), कोटक ग्रुप, अरबिंदो फार्मा, टोरेंट फार्मा या कंपन्या लिलाव प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. एमएस धोनीचा (MS Dhoni) मॅनेजर असलेल्या अरुण पांडे यांच्या रिठी स्पोर्ट्स या कंपनीने उद्योगपती आनंद पोदार यांच्या कंपनीसाठी कटकची टीम विकत घेण्यात रस दाखवला, पण बिडिंग करण्यासाठी रिठी स्पोर्ट्सला उशीर झाला, त्यामुळे त्यांचं टेंडर स्वीकारण्यात आलं नाही, असं वृत्त आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या