JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2021 सुरू होण्याआधी टीमना धक्का, हे खेळाडू बाहेर

IPL 2021 सुरू होण्याआधी टीमना धक्का, हे खेळाडू बाहेर

IPL 2021: आयपीएलचा मागचा मोसम युएईमध्ये आयोजित केल्यानंतर यंदा ही स्पर्धा पुन्हा एकदा भारतात खेळवण्यात येत आहे, पण स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच काही टीमना धक्का बसला आहे.

0104

आयपीएलचा मागचा मोसम युएईमध्ये आयोजित केल्यानंतर यंदा ही स्पर्धा पुन्हा एकदा भारतात खेळवण्यात येत आहे. 9 एप्रिल ते 30 मे या दरम्यान आयपीएल स्पर्धा (IPL 2021) खेळवली जाणार आहे. अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यामध्ये सगळ्या मॅच खेळल्या जातील. तसंच कोणतीही टीम त्यांच्या घरच्या मैदानात खेळणार नाही. या स्पर्धेसाठी प्रत्येक टीमने तयारीला सुरूवात केली आहे, पण काही टीमना त्यांचे मुख्य खेळाडू टीमबाहेर गेल्यामुळे धक्का बसला आहे.

जाहिरात
0204

जॉश फिलीप : बँगलोरचा (RCB) खेळाडू जॉश फिलीप (Josh Phillip) याने बिग बॅश लीगमध्ये शानदार कामगिरी केली होती. 23 वर्षांचा जॉश बीबीएलमध्ये सर्वाधिक रन करणारा दुसरा खेळाडू होती. विकेट कीपर म्हणूनही त्याची कामगिरी उल्लेखनीय झाली. पण आयपीएलमधून मात्र फिलीपने अचानक माघार घेतली आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमातून फिलीपने पदार्पण केलं होतं, पण त्याला 5 इनिंगमध्ये फक्त 78 रन करता आले होते. बँगलोरने फिलीपऐवजी न्यूझीलंडच्या फिन एलनची टीममध्ये निवड केली आहे. बांगलादेशविरुद्ध एलनने पदार्पण केलं होतं. न्यूझीलंडचा विकेट कीपर असलेल्या एलनने 13 टी-20 मध्ये 48.8 च्या स्ट्राईक रेटने 537 रन केले.

जाहिरात
0304

श्रेयस अय्यर : आयपीएल सुरू होण्याआधी सर्वात मोठा धक्का दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) लागला आहे, कारण त्यांना टीमसाठी नवा कर्णधार शोधावा लागणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) खांद्याला दुखापत झाली, त्यामुळे तो आयपीएलमधून बाहेर झाला आहे. खांद्याचं हाड निखळल्यामुळे श्रेयस सप्टेंबर महिन्यापर्यंत क्रिकेटपासून लांब राहील, असं बोललं जातंय.

जाहिरात
0404

जोफ्रा आर्चर : राजस्थान रॉयल्सलाही (Rajasthan Royals) जोफ्रा आर्चर या त्यांच्या प्रमुख खेळाडूंशिवाय खेळावं लागणार आहे. दुखापतीमुळे जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) आयपीएल खेळता येणार नाही. मागच्या बऱ्याच काळापासून आर्चर उजव्या हाताच्या दुखापतीने त्रस्त आहे. काहीच दिवसांपूर्वी जोफ्रा आर्चरच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या हातातून काचेचा तुकडा बाहेर काढण्यात आला. या परिस्थितीमध्ये आर्चरचं भारतात आयपीएल खेळण्यासाठी परतणं कठीण आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या