JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021 : पंजाबला हरवून विराटची RCB प्ले-ऑफमध्ये, आता चौथ्या स्थानासाठी रेस!

IPL 2021 : पंजाबला हरवून विराटची RCB प्ले-ऑफमध्ये, आता चौथ्या स्थानासाठी रेस!

विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीने पंजाब किंग्सचा (RCB vs PBKS) 6 रनने पराभव केला आहे. याचसोबत आरसीबीने प्ले-ऑफमध्येही (IPL Play Offs) प्रवेश मिळवला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शारजाह, 3 ऑक्टोबर : विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीने पंजाब किंग्सचा (RCB vs PBKS) 6 रनने पराभव केला आहे. याचसोबत आरसीबीने प्ले-ऑफमध्येही (IPL Play Offs) प्रवेश मिळवला आहे. चेन्नई आणि दिल्लीनंतरची आरसीबी ही प्ले-ऑफला पोहोचणारी तिसरी टीम ठरली आहे. बँगलोरने दिलेल्या 165 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 158 रन करता आले. मयंक अग्रवालने सर्वाधिक 57 रन केले, तर केएल राहुल 39 रन करून आऊट झाला. मयंक आणि राहुलच्या ओपनिंग जोडीने पंजाबला 10.5 ओव्हरमध्ये 91 रन केले. आरसीबकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर जॉर्ज गार्टन आणि शाहबाज अहमदला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 164 रन केले. ग्लेन मॅक्सवेलने 33 बॉलमध्ये 57 रन केले. देवदत्त पडिक्कलने 40 आणि विराटने 25 रनची खेळी केली. पंजाबकडून मोहम्मद शमीला 3 आणि मोईसेस हेनरिक्सला 3 विकेट मिळाल्या. पंजाबचं स्वप्न धुळीस या पराभवासोबतच पंजाबचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न जवळपास संपुष्टात आलं आहे. पंजाबने 13 पैकी 5 मॅच जिंकल्या तर 8 मध्ये त्यांचा पराभव झाला. पंजाबची आता एकच मॅच उरली असून या मॅचमध्ये त्यांचा विजय झाला तरी त्यांचे जास्तीत जास्त 12 पॉईंट्स होऊ शकतात. तर कोलकाता, राजस्थान आणि मुंबईच्या अजून 2 मॅच शिल्लक आहेत, त्यामुळे या दोन्ही मॅच जिंकून या तिन्ही टीम 14 पॉईंट्सपर्यंत पोहोचू शकतात. चेन्नई, दिल्ली आणि आरसीबी या टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या आहेत, तर आता चौथ्या क्रमांकासाठी कोलकाता, राजस्थान आणि मुंबई यांच्यात स्पर्धा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या