आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून चेन्नईमध्ये सुरूवात होणार आहे. पहिला सामना गतविजेती मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) यांच्यात होईल. यंदाच्या वर्षी चाहत्यांना रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांच्यात तगडी स्पर्धा पाहायला मिळेल.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून चेन्नईमध्ये सुरूवात होणार आहे. पहिला सामना गतविजेती मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात होईल. नेहमीप्रमाणे यावर्षीही चाहत्यांना त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंची रेकॉर्ड तुटताना आणि नवी रेकॉर्ड बनताना दिसतील. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये यावेळी तगडी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा मॅन ऑफ द मॅच जिंकण्याचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या (AB De Villiers) नावावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या या खेळाडूने आतापर्यंत 23 वेळा हा किताब जिंकला आहे.
दुसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्सच्या क्रिस गेलचा (Chris Gayle) नंबर लागतो. गेलने आयपीएलमध्ये 22 वेळा मॅन ऑफ द मॅच किताब पटकावला आहे.
भारताचा रोहित शर्मा (Rohit Sharma) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माने 18 वेळा मॅन ऑफ द मॅच जिंकलं आहे.
चौथ्या क्रमांकावर सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आहे. या दोघांनी प्रत्येकी 17-17 वेळा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जिंकली आहे.
शेन वॉटसन, युसूफ पठाण यांनी प्रत्येकी 16-16 वेळा तर सुरेश रैनाने (Suresh Raina) 14 वेळा हा किताब मिळवला आहे. बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीलला (Virat Kohli) 13 वेळा मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं आहे.