JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021 : 'कनफ्यूजन ही कनफ्यूजन', तरच Mumbai Indians Play Off ला पोहोचणार!

IPL 2021 : 'कनफ्यूजन ही कनफ्यूजन', तरच Mumbai Indians Play Off ला पोहोचणार!

आयपीएल 2021 (IPL 2021) चा मोसम आता अंतिम टप्प्यात आला आहे. सोबतच प्ले-ऑफची (IPL Play Off) रेस आता आणखी रोमांचक झाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 3 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) चा मोसम आता अंतिम टप्प्यात आला आहे. सोबतच प्ले-ऑफची (IPL Play Off) रेस आता आणखी रोमांचक झाली आहे. चेन्नई (CSK), दिल्ली (DC) आणि आरसीबीच्या (RCB) टीमनी प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आहे, तर चौथ्या स्थानासाठी अजूनही स्पर्धा सुरूच आहे. या रेसमध्ये आता कोलकाता (KKR), राजस्थान (Rajasthan Royals) आणि मुंबई (Mumbai Indians) आहेत. रविवारी बँगलोरविरुद्धच्या सामन्यातल्या पराभवामुळे पंजाबचं (Punjab Kings) प्ले-ऑफ गाठणं जवळपास अशक्य झालं आहे, तर सनरायजर्स हैदराबादची (SRH) टीम आधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. आयपीएलचे उरलेले सामने 4 ऑक्टोबर- दिल्ली विरुद्ध चेन्नई 5 ऑक्टोबर- मुंबई विरुद्ध राजस्थान 6 ऑक्टोबर- बँगलोर विरुद्ध हैदराबाद 7 ऑक्टोबर- चेन्नई विरुद्ध पंजाब 7 ऑक्टोबर- कोलकाता विरुद्ध राजस्थान 8 ऑक्टोबर- मुंबई विरुद्ध हैदराबाद 8 ऑक्टोबर- बँगलोर विरुद्ध दिल्ली प्ले-ऑफची रेस हैदराबादविरुद्धच्या या विजयाबरोबरच कोलकात्याचे 13 मॅचमध्ये 6 विजय आणि 7 पराभवांसह 12 पॉईंट्स झाले आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये केकेआर चौथ्या क्रमांकावर आहे. तसंच त्यांचा नेट रन रेटही +0.294 इतका आहे. कोलकात्याच्या या विजयामुळे पंजाबचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न संपुष्टात आलं आहे. तर राजस्थान आणि मुंबईसाठीही प्ले-ऑफ गाठणं आता कठीण होऊन बसलं आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबईने 12 पैकी 5 सामने जिंकल्यामुळे त्यांच्या खात्यात प्रत्येकी 10-10 पॉईंट्स आहेत. राजस्थानचा नेट रन रेट -0.337 एवढा आहे, तर मुंबईचा नेट रन रेट -0.453 आहे. याच नेट रन रेटमुळे राजस्थान सहाव्या आणि मुंबई सातव्या क्रमांकावर आहे. मुंबईसाठी गणित काय? मुंबईचे उरलेले दोन सामने आता राजस्थान आणि हैदराबादविरुद्ध आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईला विजय मिळवणं गरजेचं आहे. मुंबईने दोन्ही सामने जिंकले आणि कोलकात्याचा राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला तर मुंबई प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवू शकते. या परिस्थितीमध्ये कोलकाता आणि राजस्थान प्रत्येकी 12 पॉईंट्सवर राहतील आणि दोन्ही सामने जिंकत मुंबई 14 पॉईंट्सवर जाईल. तसंच प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी मुंबई चौथी टीम ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या