JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021 : KKR चा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? गोंधळानंतर टीमचं स्पष्टीकरण

IPL 2021 : KKR चा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? गोंधळानंतर टीमचं स्पष्टीकरण

आयपीएल (IPL 2021) सुरू व्हायच्या आधी केकेआरच्या (KKR) एका खेळाडूमुळे दिवसभर गोंधळ उडाला होता. नितीश राणा (Nitish Rana) याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह यावरून संभ्रम निर्माण झाला होता, पण अखेर कोलकात्याच्या टीमने एक प्रसिद्धीपत्रक काढून हा गोंधळ मिटवला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 एप्रिल : 9 एप्रिलपासून यंदाच्या वर्षीच्या आयपीएलला (IPL 2021) सुरूवात होत आहे. कोरोना व्हायरसमुळे खेळाडू बायो-बबलमध्ये गेले आहेत, तसंच कोरोनामुळे यंदाची स्पर्धा फक्त 6 ठिकाणी तीही प्रेक्षकांशिवाय खेळवली जाणार आहे. एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असतानाच आयपीएल सुरू व्हायच्या आधी केकेआरच्या (KKR) एका खेळाडूमुळे दिवसभर गोंधळ उडाला होता. नितीश राणा (Nitish Rana) याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह यावरून संभ्रम निर्माण झाला होता, पण अखेर कोलकात्याच्या टीमने एक प्रसिद्धीपत्रक काढून हा गोंधळ मिटवला आहे. नितीश राणा कोरोना पॉझिटिव्ह नाही, तसंच तो फिट असून लवकरच टीमशी जोडला जाईल असं केकेआरने सांगितलं आहे. ‘नितीश राणाने 21 मार्चला मुंबईच्या केकेआरच्या हॉटेलमध्ये प्रवेश केला, तेव्हा तो कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन आला होता. हा रिपोर्ट 19 मार्चचा होता. आयपीएलच्या प्रोटोकॉलनुसार त्याची पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली तेव्हा ती पॉझिटिव्ह आली. यानंतर नितीश इतरांपासून वेगळा होत विलगिकरणात गेला. नितीशची पुन्हा टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली आहे. तो लवकरच सरावाला सुरूवात करेल,’ असं केकेआरने सांगितलं. गुरूवारी माध्यमांमध्ये नितीश राणाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं वृत्त समोर आलं होतं. नितीश कोलकात्याच्या टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मागच्या मोसमात टॉप ऑर्डरला बॅटिंग करताना नितीशने चांगली कामगिरी केली होती. आयपीएल सुरू व्हायच्या एक आठवडा आधी नितीशची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असती तर केकेआरसाठी तो मोठा धक्का ठरला असता. 9 एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातल्या मॅचमधून आयपीएलला सुरूवात होणार आहे. तर कोलकाता पहिला सामना 11 एप्रिलला हैदराबादविरुद्ध खेळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या