IPL 2021: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रिझर्व्ह खेळाडू म्हणून केरळचा बॅट्समन रोजित गणेश (Rojith Ganesh) याची निवड केली आहे.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सने त्यांच्या टीममध्ये आणखी एका खेळाडूची निवड केली आहे. केरळचा बॅट्समन रोजित गणेश याला मुंबईने रिझर्व्ह खेळाडू म्हणून टीममध्ये घेतलं आहे. 27 वर्षांच्या रोजितने मागच्या महिन्यात विजय हजारे ट्रॉफीमधून लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. (Photo- rojithganesh)
रोजित गणेशने विजय हजारे ट्रॉफीमध्ये फक्त दोन मॅच खेळल्या आहेत. पदार्पणाच्या मॅचमध्ये रोजितने उत्तर प्रदेशविरुद्ध नाबाद 6 रन केले, तर दुसऱ्या सामन्यात तो 4 रन करून आऊट झाला. (Photo- rojithganesh)
रोजित गणेशने आतापर्यंत एकही टी-20 मॅच खेळलेली नाही. तसंच रणजी ट्रॉफीमध्येही त्याने पदार्पण केलेलं नाही. पण केसीए प्रेसिडेंट टी-20 कपमधल्या रोजितच्या कामगिरीमुळे मुंबईने त्याला टीममध्ये घेतलं आहे. (Photo- rojithganesh)