JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021 : Mumbai Indians Play Off मध्ये पोहोचणार? रोहितसाठी आशेचा शेवटचा किरण

IPL 2021 : Mumbai Indians Play Off मध्ये पोहोचणार? रोहितसाठी आशेचा शेवटचा किरण

आयपीएल 2021 (IPL 2021) चा सिझन आता शेवटाकडे आला आहे. लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्याच्या 24 तास आधी प्ले-ऑफच्या (IPL Play Off) चार टीम जवळपास निश्चित झाल्या आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) चा सिझन आता शेवटाकडे आला आहे. लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्याच्या 24 तास आधी प्ले-ऑफच्या (IPL Play Off) चार टीम जवळपास निश्चित झाल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा (KKR vs RR) 86 रनने पराभव केल्यामुळे पंजाब किंग्सचं (Punjab Kings) प्ले-ऑफचं स्वप्न भंगलं आहे, तर 5 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) स्वप्नांचाही या सामन्यामुळे चुराडा झाला आहे. प्ले-ऑफमध्ये पोहोचणं मुंबईसाठी आता अशक्य दिसत असलं तरी रोहित शर्माच्या टीमसाठी अजूनही एक आशेचा किरण आहे. मुंबईसाठी आशेचा किरण कोलकात्याचा प्ले-ऑफमधला प्रवेश निश्चित झाला असला तरी मुंबईसाठी अजून एक आशेचा किरण शिल्लक आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईला पहिले 200 रन पेक्षा जास्तचा स्कोअर करावा लागेल, यानंतर मुंबईला हैदराबादवर 171 रनने विजय मिळवावा लागेल. शुक्रवारच्या सामन्यात हैदराबादने मुंबईला दुसऱ्यांदा बॅटिंग दिली तर मात्र मुंबईचा प्ले-ऑफमध्ये प्रवेश होणार नाही. पॉईंट्स टेबलची स्थिती कोलकाता नाईट रायडर्सने 14 पैकी 7 मॅच जिंकल्या तर 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. केकेआरच्या खात्यात 14 पॉईंट्स असले तरी त्यांचा नेट रन रेट +0.587 एवढा आहे. कोलकात्याचा नेट रन रेट इतर टीमपेक्षा चांगला आहे. पंजाब आणि राजस्थानच्या सगळ्या मॅच संपल्या आहेत, तर मुंबईचा अजून एक सामना शिल्लक आहे. पंजाबने 14 पैकी 6 मॅच जिंकल्या तर राजस्थानला 14 पैकी फक्त 5 सामने जिंकता आले. मुंबईने 13 पैकी 6 मॅच जिंकल्या असून 7 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या